शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट; ‘आप’चा रस्त्यावर ठिय्या

By admin | Updated: February 18, 2015 02:09 IST

अकोला शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती; जलप्रदाय विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

अकोला : बाश्रीटाकळी गावानजीक मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडल्याने मागील नऊ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता. व्हॉल्व दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी जलप्रदाय विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली असून, मुख्य मार्गांवर पाण्याचे अक्षरश: लोट वाहत आहेत. मनपाच्या लेखी पाण्याची किंमत शून्य असल्याने की काय, आम आदमी पक्षाच्यावतीने मंगळवारी पाणी असलेल्या रस्त्यांवर ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीनंतर अकोला शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यादरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये जलवाहिन्यांना गळती लागून त्यामधून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. यासंदर्भातील सचित्र वृत्त लोकमतमध्ये उमटल्यानंतर देखील मनपाची प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अकोलेकरांना दहा दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याने काही काळासाठी का होईना, पाण्याची नासाडी सहन करावी लागेल, असा अनाहूत सल्ला प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांकडून मिळत आहे. महान धरणातील अत्यल्प जलसाठा व उन्हाळ्य़ातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाण्याची काटकसर करण्याची नितांत आवश्यकता आहे. नागरिकांना पाणी मिळत असल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीसुद्धा नासाडीकडे दुर्लक्ष केले. अशोक वाटिका चौकात जलवाहिनीसह व्हॉल्व्हला गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळेच पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवारी दुपारी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. गळती त्वरित दुरुस्त न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला.