शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा, मात्र तहानलेलेच!

By admin | Updated: September 18, 2014 02:41 IST

व-हाडातील दहा धरणांमधून विसर्ग सुरू; काटेपुर्णातील जलसाठा केवळ ३९ टक्के!

अकोला : पश्‍चिम विदर्भातील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून, दहा धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरू आहे; परंतु अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ३९ टक्कय़ावरच स्थिरावला आहे. यामुळे अकोलेकरांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला विदर्भातील काही जिल्हय़ात चांगला पाऊस झाला, पण अकोला व वाशिम जिल्हय़ाला हवा तसा पाऊस झाला नसल्याने या जिल्हय़ातील धरणांच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. पातूर तालुक्यातील निगरुणा हे छोटे धरण मात्र शंभर टक्के भरले असून, या धरणातून २.५ सेंमीचा साडवा वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेंकद २.४ दलघमी प्रतितास एवढा आहे. मोर्णा धरणात २४.४९ दलघमी म्हणजेच ५९ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या धरणामध्ये २४ टक्के जलसाठा संचयीत झाला असून, बाश्रीटाकळी तालुक्यातील दगड पारवा या धरणाची पातळी शून्य आहे. आकोट तालुक्यातील पोपटखेड या लघू पाटबंधार्‍याचे दोन वक्रद्वार १ सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामधून प्रतिसेकंद २.६७ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर तेल्हारा तालुक्यातील वाण या प्रकल्पाचे दोन वक्रद्वार १0 सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामधून प्रतिसेकंद १६.७२ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती सुधारली असून, मस, कोराडी व पलढग ही तीन धरणं शंभर टक्के भरली आहेत. यातील मस धरणातून ५ सेंमी साडवा वाहत असून, याचा पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद २ दलघमी आहे. पलढगमधून ५ सेंमी वरू न पाणी वाहत असून, हा प्रतिसेंकद १३ दलघमी एवढा विसर्ग सुरू आहे. या जिल्हय़ातील नळगंगा या धरणात ५७ तर ज्ञानगंगा या धरणाचा जलसाठा ७३ टक्के आहे. यवतमाळ जिल्हय़ातील सहा धरणं ओव्हर फ्लो आहेत. यातील सायखेडा या धरणातून ६ सेंमीवरू न पाणी साडवा सुरू असून, प्रतिसेंकद ११ दलघमी विसर्ग सुरू आहे. गोकी धरणातूनही ६ सेंमी पाणी वाहत आहे. हा विसर्ग प्रतिसेकंद ६ दलघमी आहे. वाघाडी या धरणातून ६ सेंमीने पाणी वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेकंद ३ दलघमी एवढा आहे तर बोरगाव या धरणातून १ सेंमी वरू न पाणी वाहत आहे. याचा विसर्ग 0.२४ दलघमी आहे.