कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचारात अनियमितता; आणखी एका रुग्णालयास ५० हजारांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:20+5:302021-04-21T04:19:20+5:30
शहरातील माऊंट कारमेल शाळेजवळ असलेल्या ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी ...

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचारात अनियमितता; आणखी एका रुग्णालयास ५० हजारांचा दंड!
शहरातील माऊंट कारमेल शाळेजवळ असलेल्या ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने चौकशी केली. त्यामध्ये या रुग्णालयात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना अनियमितता होत असल्याचे आढळून आले. तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालनही करण्यात आले नसल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानुसार संबंधित खासगी रुग्णालय चालकास ५० हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना अनियमिता आढळून आलेल्या आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या शहरातील सहा खासगी रुग्णालय चालकांना प्रत्येकी ५० रुपये दंड आकारण्याचा आदेश यापूर्वी १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता, हे येथे उल्लेखनीय.