नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:27 IST2025-11-15T20:18:33+5:302025-11-15T20:27:19+5:30
अकोल्याचा पूत्र बिहारच्या निवडणुकीत अपयशी : दोन्ही विधानसभा मतदारसंघात लांडे यांचा पराभव

IPS officer quits job and enters Bihar election fray; How many votes did Maratha-born Lande get?
अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अररिया आणि जमालपूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अकोल्याचे पुत्र आणि माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना अपयशाचा सामना करावा लागला. अररिया मतदारसंघात त्यांना ४०८५ मतदान मिळाले आहे. तेथे काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला ९१,५२९ मते मिळाली आहेत. तर जमालपूर मतदारसंघात वृत्त लिहिपर्यंत २८ व्या फेरीअखेर त्यांना १५५२८ मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर होते तर जनता दलाचे उमेदवार नचिकेत मंडल यांना ९६,३०३ मते मिळाली.
खाकी सोडून खादी अंगावर चढविणाऱ्या लांडेंना मोठा धक्का बसला आहे. भारतीय पोलिस सेवेत बिहारमध्ये कारकीर्द गाजविणारे लांडे यांनी राजीनामा देऊन हिंदसेना नावाचा पक्ष स्थापन करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पक्षाला मान्यता न मिळाल्याने त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून अररिया व जमालपूर या दोन मतदारसंघातून भाग्य आजमाविले, त्यात त्यांना अपयश आले. अररिया मतदारसंघात काँग्रेसचे अबिदूर रहमान विजयी झाले आहेत, तर शिवदीप लांडे यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.