शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी जनता अनुकूल!

By admin | Updated: July 29, 2014 20:35 IST

क्रांतिदिनी प्रत्येकाच्या हाताला बांधणार ‘विदर्भ बंध’ - शरद पाटील

अकोला : स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कधी नव्हे एवढे जनमत एकवटले असून, या मागणीसाठी उभारलेल्या लढय़ाला विदर्भातील जनतेचा, तसेच राजकीय पक्षांचाही पाठिंबा आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी व विदर्भ अस्मिता जागविण्यासाठी, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी विदर्भातील जनतेच्या हाताला 'विदर्भ बंध' बांधणार असल्याची माहिती, जनमंच या सामाजिक संघटनेचे नेते शरद पाटील यांनी लोकमतशी बातचित करताना दिली. पाटीलप्रश्न- स्वतंत्र विदर्भासाठी आतापर्यंतचे लढे अयशस्वी झाले. हा लढा तरी यशस्वी होईल का?-आजपर्यंतचे लढे अयशस्वी झाले याबद्द्ल दुमत नाही; परंतु यावेळी जनमंचच्या लढय़ाला विदर्भातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. हा लढा जनतेतून उभा झाला आहे. जनमंचने विदर्भात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या जनमत चाचणीत, सहा लाख मतदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल दिला.प्रश्न- वेगळ्य़ा विदर्भाला शिवसेनेचा तर विरोध आहे?- असो ना! भारतीय जनता पक्ष मात्र विदर्भाच्या बाजूने आहे, भाजपने भुवनेश्‍वरला झालेल्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव यापूर्वीच पारित केलेला आहे. छोटी राज्य असली तर त्या राज्याचा विकास साधता येतो. म्हणूनच भाजपाने छत्तीसगड, उत्तराचंल, झारखंड या छोट्या राज्यांची निर्मिती केली आहे. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाला कोणतीच अडचण येणार नाही. प्रश्न- एखादे राज्य वेगळे करण्यासाठी त्यास राज्य शासनाची अनुमती नको का? - हा गैरसमज म्हणावा लागेल. स्वतंत्र तेलंगण झाले तेव्हा कुठे आंध्र प्रदेश सरकारला विचारले होते. स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारला असतात. ज्या राज्याचे विभाजन करायचे आहे, त्या राज्य सरकारला केवळ या संदर्भातील प्रस्ताव पाठवून मत मागविले जाते. प्रश्न - आंदोलनाचे पुढील स्वरू प काय ?- स्वतंत्र विदर्भासाठी जनतेच्या भावनाच तीव्र आहेत. याबाबत प्रचंड आत्मविश्‍वास आहे. म्हणूनच, या अनुकूलतेला अधिक गती देण्यासाठी आम्ही विदर्भव्यापी दौरे आयोजित केले असून, विदर्भाचा वसाहत म्हणून कसा वापर केला जात आहे, याची जाणीव जनतेला करू न दिली जाणार आहे.