अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी

By Atul.jaiswal | Published: May 15, 2024 02:18 PM2024-05-15T14:18:49+5:302024-05-15T14:19:08+5:30

अकोला शहरातील प्रसिद्ध आंगडीया सर्व्हिसवर बुधवारी पहाटे छापा टाकण्यात आला आहे.

Income Tax Department raids Angadia Service in Akola | अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी

अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी

  अकोला : आयकर विभागाने नांदेड येथे केलेल्या कारवाई नंतर त्यांचा मोर्चा अकोला शहराकडे वळविल्याचे समोर आले आहे. बुधवारी पहाटे नागपूर आयकर विभागाने अकोल्यातील आंगडिया सर्विस एजन्सीच्या कार्यालयात छापा टाकला आहे. या छापेमारीमुळे शहरातील काही बड्या उद्योगपतींच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा आहे. 
शहरातील जुना कापड बाजारात अशोकराज आंगडिया सर्विस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना कुरियर व इतर पार्सल सुविधा पुरविली जाते. बुधवारी पहाटे नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या एजन्सीच्या कार्यालयात छापा घातला. एजन्सी मार्फत होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाण व इतर व्यवहारांचे सर्वेक्षण केल्या जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारपर्यंत या कारवाईत नेमकं काय आढळून आले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: Income Tax Department raids Angadia Service in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.