शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अकोल्यात गर्भपाताचा गोरखधंदा; नर्सिंग होम सील, बोगस डॉक्टर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:18 IST

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम सील केले . बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देया हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात करण्याचा सपाटाच राजरोसपणे सुरू केला होता. विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी रविवारी रात्रीला छापा टाकला. बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम या ठिकाणी एका डॉक्टरने बेकायदेशीर गर्भपात सुरू केल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी रविवारी रात्रीला छापा टाकला. या पथकासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम सील केले आहे व बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.रूपेश तेलगोटे नामक बोगस डॉक्टरने न्यू भागवत प्लॉट परिसरात ऋषी नर्सिंग होम हे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात करण्याचा सपाटाच राजरोसपणे सुरू केला होता.सदर बोगस डॉक्टरसह बेकायदेशीर सुरू असलेल्या या हॉस्पिटलची आणि अवैधरीत्या सुरू असलेल्या गर्भपाताची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना काही महिन्यांपूर्वी मिळाली. बहाकर यांनी त्यांच्या पथकासह या हॉस्पिटलवर पाळत ठेवली. रविवारी रात्री सापळा रचला.बनावट पती तसेच गर्भवती महिला या रुणालयात पाठविले. या बनावट पतीने इशारा देताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सदर रुग्णालय तसेच डॉक्टरच बोगस असल्याचे आढळून आले. सदर कारवाईत बोगस डॉक्टर रूपेश तेलगोटे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला सहकार्य करणारी परिचारिका वैशाली संजय गवई, रा. पातूर व गर्भपाताच्या किट्स आणून देणारा रवी भास्कर इंगळे या तिघांना रविवारी रात्री ११.३0 वाजता अटक करण्यात आली. या कारवाईत वैद्यकीय आरोग्य अधिकारी फारुख शेख, अ‍ॅड. शुभांगी खाडे, अंकुश गंगा खेडकर, हेमंत मेटकर यांनी सहभाग घेतला.

आरोग्य विभाग झोपेतजिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीर सुरू असलेल्या तसेच बोगस डॉक्टरने चालविलेल्या हॉस्पिटलची माहिती मिळाली. या ठिकाणी अवैधरीत्या राजरोस सुरू असल्याचीही पथकाला माहिती मिळाली; मात्र हीच माहिती आरोग्य विभागाला का मिळाली नाही, हा प्रश्न निर्माण झाला असून, आरोग्य विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गर्भपाताच्या किट्स सहज उपलब्धऋषी नर्सिंग होम या ठिकाणी महिलांचे गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाºया गर्भपाताच्या किट्स या दवा बाजारातील काही व्यापाऱ्यांनी पुरविण्याची माहितीही सूत्रांनी दिली. यासाठी काही ‘एमआर’ आणि दलाल डॉक्टर तेलगोटेच्या संपर्कात होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक बडे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.

रुग्णालयच बेकायदेशीर! ऋषी नर्सिंग होम या हॉस्पिटलचा डॉक्टर संचालक रूपेश तेलगोटे हा केवळ १२ वी शिकला असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी असल्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे या डॉक्टरसह सदर हॉस्पिटलही बोगस असल्याचे स्पष्ट होते. येथे काम करणाºया परिचारिकाही बोगस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बोगस डॉक्टरकडे शहरातील काही डॉक्टर महिलांना गर्भपातासाठी पाठवित असल्याची माहितीही सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या गोरखधंद्यात शहरातील नामांकित डॉक्टर ही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAbortionगर्भपातhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर