शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क आयोगाचे घरोघरी न्यायदान अभियान

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बन्नुरमठ यांच्याशी संवाद.

सिध्दार्थ आराख/बुलडाणा : आयोगाकडे आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी आणि मानवी हक्काबद्दल प्रत्येकानं संवेदनशील असलं पाहीजे, याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मानवी हक्क आयोगाने ह्यघरोघरी न्यायदानह्ण हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत विभागवार दौरे करून तक्रारींचा निपटारा त्याच ठिकाणी केला जात असल्याची माहीती मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बन्नुरमठ यांनी दिली.

प्रश्न : मानवी हक्क आयोगाची रचना कशी असते?

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ही कायद्याने निर्माण केलेली स्वायत्त वैधानिक संस्था आहे. या आयोगात तीन सदस्य असतात. आयोगाचे अध्यक्ष पद हे नवृत्त मुख्य न्यायमूर्तीकडे असते. एक सदस्य जिल्हा न्यायधिश पदावर किमान सात वर्ष काम केलेला असावा, तर दुसरा सदस्य ज्याला मानवी हक्काबद्दल ज्ञान आहे किंवा त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव त्याला असावा.

प्रश्न : मानवी हक्क आयोगाचे काम कसे चालते?

लोकसेवकांकडून होणार्‍या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर नजर ठेवणे, त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करून निर्णय देणे. एखाद्या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आयोगाकडे पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक दर्जाचे अधिकारी आणि आवश्यक ती पोलीस यंत्रणा आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्षपणे केली जाते. राज्य सरकारला पूर्वसुचना देवून आयोगाचे अध्यक्ष, सदस्य हे सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या कारागृह, पोलिस स्टेशन, रुग्णालय येथे भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करू शकतात.

प्रश्न : आयोग काम करताना कोणत्या बाबीकडे विशेष लक्ष देतो?

सामाजिक दृष्टीकोण, बेकायदेशीर स्थानबध्दता आणि वेठबिगार, स्त्रीया आणि मुलांचे होणारे शोषण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे हक्क अबाधित ठेवणे, स्वास्थ्य आणि पर्यावरण, ज्येष्ठ नागरीकांचे संरक्षण आणि जनमाणसात मानवी हक्काची जागृती करणे.

प्रश्न : प्रश्न:आयोगाकडे तक्रार कशी करावी?

आयोगाकडे साध्या कागदावर मराठी, हींदी, इंग्रजी भाषेत तक्रार करता येते. त्यासाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येत नाही किंवा वकिल ठेवण्याचीही गरज नाही, तक्रारदार स्वत: आयोगासमोर युक्तीवाद करू शकतो आणि गैरहजर असल्यास आयोग स्वत: तक्रारदार आहे असे समजून त्या प्रश्नाचा विचार करते.

प्रश्न : दोषी व्यक्तीला शिक्षा ठोठावण्याचे अधिकार आयोगाला आहेत काय?

मानवी हक्काच्या उलंघनास कारणीभूत ठरलेल्या व चौकशीत तसे सिध्द झालेल्या सार्वजनिक सेवेतील व्यक्तीवर कारवाई करण्याची अथवा न्यायालयीन खटला दाखल करण्याची शिफारस आयोग करू शकतो. त्यानंतरही आरोपीला संबंधीत यंत्रणेने शिक्षा न दिल्यास त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करण्याचे अधिकार आयोगाला आहेत.