शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

लाभार्थींनी उभारले घरकुल; निधीसाठी मनपाचे हात वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:35 IST

मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १३ मधील शिवरवासीयांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र असून, पात्र लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने मागील वर्षभरापासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. घराचे बांधकाम करण्यासाठी उसनवारीने रेती, विटा, सिमेंट घेतले असून, अवैध सावकारीचा तगादा मागे लागल्यामुळे पुढील सात दिवसांच्या मनपा प्रशासनाने थकीत हप्त्यांचा निधी वितरित न केल्यास मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १३ मधील शिवरवासीयांनी दिला आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे आश्वासन केंद्रासह तत्कालीन राज्य शासनाने दिले होते. महापालिकेच्या स्तरावर ही योजना तातडीने निकाली काढण्यासाठी केंद्राने निधी मंजूर केला. योजनेची व्याप्ती पाहता मनपा प्रशासनाने २०१६ मध्ये ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी शून्य कन्सलटन्सीची नियुक्ती केली. शून्य कन्सलटन्सीने सर्वप्रथम झोपडपट्टी भागात सर्व्हे करून घरांचा ‘डीपीआर’ तयार केल्यानंतर विविध भागातील घरांसाठी एकूण दहा ‘डीपीआर’तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर केले.या प्रकल्प अहवालांना केंद्राची मंजुरी मिळाली आहे. योजनेचे निकष पाहता लाभार्थींची उपेक्षा केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील शिवर परिसरातील लाभार्थींची घरे मंजूर झाली. लाभार्थींनी घरांच्या बांधकामाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या टप्प्याचा हप्ता वितरित झाला. त्यानंतर वर्षभरापासून लाभार्थींना मनपाने एक छदामही अदा केला नाही. परिणामी अंगावरचे सोने विकून, खासगी सावकारांकडून पैसे घेऊन घरे बांधणारे लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही!प्रभाग क्रमांक १३ मध्ये चारही नगरसेवक सत्ताधारी भाजपाचे असून, शिवर भागातील लाभार्थींचे मागील वर्षभरापासून अनुदानाचे हप्ते थकीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे सुनीता विजय भिमटे, विमल मोहन झाल्टे, वनिता वानखडे, कविता भिमटे, धनश्री काकड, लता देशमुख, प्रीती काळे, उज्ज्वला इंगळे, सुनीता चव्हाण, सिंधू बोदडे, राजकन्या इंगळे, ललिता गुप्ता, अश्विनी नांगरे, सुनीता ब्राह्मणकर, पद्मावती भोजने, रेखा पाटील यांसह असंख्य लाभार्थींनी निवेदनात नमूद केले आहे.

मनपा-सत्ताधाऱ्यांकडून पाठपुरावाच नाही!मनपा प्रशासनाच्या लेखी शून्य कन्सलटन्सीने आजवर १० प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केले. या ‘डीपीआर’ अंतर्गत ५ हजार ९०२ घरांना केंद्र व राज्य शासनाची मंजुरी मिळाली. मागील तीन वर्षांमध्ये अवघ्या ६९६ घरांचे बांधकाम सुरू असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पात्र लाभार्थींना फायदा व्हावा, यासाठी प्रशासन तर सोडाच खुद्द सत्ताधारी भाजपाच्या स्तरावरूनही पाठपुरावा केला जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका