शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार ७ दिवसांत मदत

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

विधीमंडळ विशेष; रणजित पाटील यांनी उपस्थित केला मुद्दा; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा

अकोला: जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना ७ दिवसांच्या आत मदत देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. शेतकर्‍यांच्या मदतीबाबतचा मुद्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला.
गतवर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागांमधील खरिपातील पीक परिस्थिती असमाधानकारक असतानाच मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील हातचे पीक गेल्याने शेतकरी पुरता खसला. गारांमुळे शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. गहू, हरभरा, भुईमूग, कपाशी, फळबागा पिके उद्ध्वस्त झाले. कर्ज काढले, संपूर्ण कुटुंब शेतात राबले, पीक उभे झाले; मात्र गारपिटीने तोंडचा घास पळविला, संसाराचा गाडा कसा ओढू, या विवंचनेत शेतकरी सापडला. महसूल विभागानेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी, अशी मागणी होऊ लागली होती.

**४३ कोटी रुपये केले वितरित
गारपिटीचा तडाखा शेतीसह घरांनाही बसला होता. त्यामुळे महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. नुकसानाची अहवालही जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार एकूण ५७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी ४३ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली. मदतीचा प्रश्न आता विधिमंडळात पोहोचल्याने लवकरच शेतकर्‍यांपर्यंत उर्वरित मदत पोहोचणार आहे.