खामगाव, दि. १८- पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी वगळता इतर १४ जणांच्या जामीन अर्जावर शनिवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे. तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे निवासी आदिवासी आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात एकूण १७ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, यामधील १५ आरोपी अटकेत आहेत. या आरोपींच्यावतीने जामिनसाठी खामगाव न्यायालयात अर्ज दाखल केले. घटनेतील मुख्य आरोपी इत्तुसिंग काकुसिंग पवार वगळता इतर १४ जणांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}