शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला धोरण; ५ ऑगस्टला अकोला मनपाची बैठक

By admin | Updated: August 1, 2014 02:23 IST

अतिक्रमित व्यावसायिकांचा तिढा मार्गी लागण्याची अपेक्षा.

अकोला : शहरात रस्त्यालगत व्यवसाय थाटणार्‍या अतिक्रमित लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ह्यराष्ट्रीय फेरीवाला धोरणह्ण लागू करणे मनपाला बंधनकारक आहे. मनपाने अतिक्रमणाच्या सबबीखाली लघू व्यावसायिकांची हकालपट्टी केल्यावर फेरीवाला धोरण लागू करणे क्रमप्राप्त होते. या मुद्यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने येत्या ५ ऑगस्ट रोजी फेरीवाला धोरणावर बैठक आयोजित केल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासनाने मागील दोन महिन्यांपासून मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. शहराच्या गल्लीबोळात, मोठे नाले यांवर अ ितक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. प्रशासनाने बहुतांश अतिक्रमकांची हकालपट्टी केली. यामध्ये संबंधित लघू व्यावसायिकांची उपासमार होत असल्यामुळे प्रशासनाने पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यालगत व्यवसाय करणार्‍या लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांसाठी फेब्रुवारी २0१४ मध्ये नवीन नियमावली जारी केली. त्यामध्ये संबंधित मनपा प्रशासनाने समितीचे गठन करून फेरीवाल्यांसाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी मात्र लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर प्रशासनाने ह्यराष्ट्रीय फेरीवाला धोरणह्णनुसार अद्यापि कोणतीही तयारी केली नसल्याचे चित्र आहे.
या मुद्यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने फेरीवाला धोरणावर येत्या ५ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केल्याची माहिती आहे. या बैठकीत लघू व्यावसायिकांचा तिढा मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*कोण असेल समितीमध्ये?
मनपा अंतर्गत स्थापन होणार्‍या फेरीवाला समितीमध्ये अध्यक्षपदी आयुक्त किंवा आयुक्तांनी निर्देशित केलेले वरिष्ठ अधिकारी, सदस्य म्हणून नगर रचनाचे सहायक नगर रचनाकार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, संबंधित भागाचे पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस निरीक्षक, फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, व्यापार व वाणिज्य समूहाचे प्रतिनिधी, शेड्युल्ड बँकेचे प्रतिनिधी आदींचा समावेश राहील.