अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरुन गुटखा जप्त, २२ वर्षीय युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 18:25 IST2022-09-16T18:22:15+5:302022-09-16T18:25:09+5:30

बोरगाव मंजू येथील रहिवासी सय्यद मुसिक सय्यद मोबीन वय २२ वर्षे हा एम एच ३० बीएफ ००६३ क्रमांकाच्या दुचाकी वर गुटख्याचा साठा घेऊन अकोल्याकडे येत असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली

Gutkha seized from national highway, 22-year-old youth arrested in akola | अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरुन गुटखा जप्त, २२ वर्षीय युवकाला अटक

अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरुन गुटखा जप्त, २२ वर्षीय युवकाला अटक

सचिन राऊत

अकोला : बोरगाव मंजू परिसरातून अकोल्यातील शिवनीकडे एका दुचाकीवर गुटख्याचा साठा घेऊन येत असलेल्या युवकास एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करून अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल साठा जप्त करण्यात आला आहे. 

बोरगाव मंजू येथील रहिवासी सय्यद मुसिक सय्यद मोबीन वय २२ वर्षे हा एम एच ३० बीएफ ००६३ क्रमांकाच्या दुचाकी वर गुटख्याचा साठा घेऊन अकोल्याकडे येत असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून राजहंस धाब्यानजीक नाकाबंदी केली. हा युवक येताच त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे व त्यांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
 

Web Title: Gutkha seized from national highway, 22-year-old youth arrested in akola