शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 2:17 PM

२२ वर्षीय प्रणवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

अकोला : राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेलेला बॉक्सर प्रणव राऊत याने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. २२ वर्षीय प्रणवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने सुवर्णपदक पटकावले होते.प्रणव शुक्रवारी सकाळी क्रीडा प्रबोधनीत आला होता. बराच वेळ तो खोलीतून बाहेर न आल्यामुळे मित्रांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद असल्यामुळे अखेर प्रणवच्या मित्रांनी दार तोडलं. त्यावेळी प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रणवने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रणवच्या आत्महत्येविषयी माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रणवने ऐन उमेदीच्या वयात अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याचा सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अकोल्यासह राज्यभरातील क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणवच्या आत्महत्येचं नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्याPoliceपोलिस