शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सेना-भाजपा आणि काँग्रेस विदर्भातून हद्दपार व्हावे हेच ध्येय - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 1:16 PM

वेगळ््या विदर्भ राज्याच्या लढाईत सेना-भाजपा आणि काँग्रेसने येथील जनतेला केवळ मतांसाठी वापरून घेतले आहे.

अकोला: वेगळ््या विदर्भ राज्याच्या लढाईत सेना-भाजपा आणि काँग्रेसने येथील जनतेला केवळ मतांसाठी वापरून घेतले आहे. त्यामुळे आता या तिन्ही राजकीय पक्षांना विदर्भातून हद्दपार करणे, हेच आमचे ध्येय आहे, अशी माहिती माजी आमदार तथा विदर्भ निर्माण महासंघाचे संयोजक अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.विदर्भ निर्माण महासंघातर्फे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढाईच्या दृष्टिकोनातून विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात विदर्भ निर्माण महासंघाने आपले उमेदवार विविध पक्षांशी आघाडी करून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामध्ये स्वभाव शेतकरी संघटना, जनसुराज्य पार्टी, नागविदर्भ आंदोलन समिती, लोकजागर पार्टी, जांबुवंतराव धोटे विचारमंच आदींचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या उमेदवारांच्या विजयासाठी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, रास्त भाव, कर्जमुक्ती, पूर्णवेळ २० सिंचनाचा अनुशेष व अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावणे त्याच सोबत बेरोजगारी दूर करणे, नक्षलवादाला सामाजिक प्रवाहात आणून त्यांना आर्थिक संपन्न करणे, आदिवासी भागातील कुपोषण थांबविणे, विदर्भातील औष्णिक वीज प्रकल्पात नवीन संपत्ती, नवीन तंत्रज्ञान वापरून प्रदूषणमुक्त करणे तसेच या भागाला खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मनुष्यबळ संपत्ती प्रबळ करण्यासाठी सर्व विदर्भवादी उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. त्यासाठी अकोला लोकसभेतून गजानन हरणे यांना समर्थन देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, शेतकरी संघटना विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडी प्रमुख रंजना मामडे, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख अविनाश नारकर यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोलाWamanrao Chatapवामनराव चटपVidarbhaविदर्भakola-pcअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेस