शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीच टॉपर

By admin | Updated: June 18, 2014 01:14 IST

बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.

अकोला : बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. अकोला जिल्ह्यातून बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे या विद्यार्थिनीने ९९.२0 टक्के गुण मिळवून आघाडी घेतली आहे. स्व. ज्योती जानोळकर विद्यालयाची प्राची जानोरकरने ९८.८0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ८0.७५ टक्के लागला असून, ८४.३७ टक्के मुली, तर ७७.४३ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विभागात अकोला जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्यातील अवनी खोडकुंभे ५00 पैकी ४९६ गुण प्राप्त केले. ९९.२0 गुण मिळविणार्‍या अवनी येथील बाल शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने संस्कृत आणि गणित या दोन विषयांमध्ये १00 पैकी १00 गुण मिळविले आहेत. तिचे वडील रामदास खोडकुंभे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता आहेत. तिची आई वैदेही या अकोला येथील आरएलटी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. तिला भविष्यात आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. परिश्रम करून आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही यश मिळविता येऊ शकते, असे अवनीने सांगितले. अमरावती विभागात सर्वात कमी निकाल अकोला जिल्ह्याचा लागला आहे. जिल्ह्यातील ४१८ शाळांच्या २६,७१0 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात २६,६३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १३,९२४ मुले आणि १२,७0९ मुली होत्या. २१,५0५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये १0,७२३ मुले, तर १0,७२३ मुली आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७७.४३ असून ८४.३७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे.