जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय
अकोला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे खडकी परिसरात दिसून येते. मागील अनेक वर्षांपासून मुख्य जलवाहिनीतून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येणारा काळ उन्हाळ्याचा असल्याने शहराला पाणी टंचाईची झळ बसू शकते. त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळीच जलवाहिनी दुरुस्ती करण्याची गरज आहे.
दिवसाही पथदिवे सुरूच
अकोला : शहरातील खडकी परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. असाच प्रकार शहरातील इतर भागातही दिसून येत आहे. मात्र, काही भागात अजूनही पथदिव्यांअभावी रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.