जी. के. अकादमीतर्फे यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:22+5:302021-07-30T04:20:22+5:30

फोटो (साइज 8 x 5) _________________ सेठ बंसीधर विद्यालयात सेठ बंसीधरजी झुनझुनवाला पुण्यतिथी तेल्हारा : सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल ...

G. K. Academy felicitates successful student | जी. के. अकादमीतर्फे यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार

जी. के. अकादमीतर्फे यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार

फोटो

(साइज 8 x 5)

_________________

सेठ बंसीधर विद्यालयात सेठ बंसीधरजी झुनझुनवाला पुण्यतिथी

तेल्हारा : सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा द्वारा संचालित स्थानिक सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी सकाळी संस्थेच्या सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेज (इंग्रजी माध्यम) या तिन्ही विभागांतर्फे स्व. सेठ बंसीधर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक गोपालदास मल्ल, संचालक अश्विनी खारोडे, विक्रम जोशी, विष्णू मल्ल, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार देशमुख, आशिष अग्रवाल, रंजना भागवत, उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा उपस्थित होते. मान्यवरांनी सेठ बंसीधर झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सेठ बंसीधर झुनझुनवाला यांच्या कार्यकर्तृत्वावर मुकुंद सोनीकर यांनी प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्रकुमार देशमुख यांनी केले. (वा.प्र.)

फोटो

(साइज 8 x 5)

Web Title: G. K. Academy felicitates successful student