रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:01 IST2020-04-03T18:01:18+5:302020-04-03T18:01:45+5:30
चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान झाले.

रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग
तेल्हारा- तालुक्यातील रायखेड शेत शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवार दि. 2 एप्रिल ला घडली आहे.
रायखेड येथील शेतकरी श्रीधर हरिश्चंद्र नेमाडे यांच्या चार एकर काढणीस तयार असलेल्या गहू पिकाला शार्ट सर्कीट होवून आग लागल्याचे प्रथम दर्शनी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चार एकर शेतातील गहू काढणीस तयार झाला होता. कोरोणा मुळे मजुर व हार्वेस्टर मिळत नसल्याने गहू काढला गेला नाही. त्यामुळे श्रीधर नेमाडे यांचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. अचानक लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शिवाजी नेमाडे, सुरेश नेमाडे, गणेश नेमाडे, संदिप नेमाडे,निलेश नेमाडे, संतोष अघमकर यांनी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही. या शेताला लागून असलेल्या इतर शेतकऱ्यांचे गहू पिकांचे नुकसान होता होता वाचले.नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.