शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

शिकवण्यात नापास शिक्षकांवर कारवाईचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:54 PM

विद्यार्थ्यांना पाठ शिकवण्यातही नापास झालेल्या ११ शिक्षकांवरील कारवाईची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे.

अकोला : विद्यार्थ्यांना पाठ शिकवण्यातही नापास झालेल्या ११ शिक्षकांवरील कारवाईची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. त्या शिक्षकांना आता कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शिक्षकांच्या स्पष्टीकरणानंतर कोणती कारवाई होईल, याबाबत कुठलीही स्पष्टता प्रशासकीय स्तरावर आतापर्यंतही दिसून आलेली नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील १४ पैकी ११ शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्यक्ष घेतलेल्या शिकवण्याच्या पाठातून पुढे आला. जिल्ह्यातील शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी समिती गठित केली. पाच सदस्यीय समितीमध्ये संस्थेचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता विस्तार अधिकारी परोपटे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांचा समावेश होता. समितीसमोर १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. तर सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, यावर शिक्षण समितीकडून ठराव घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २४ जून रोजी सांगितले होते. त्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रभार आला. शिक्षण विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव अद्यापही तयार झालेला नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांना अभय देण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.

या शिक्षकांना मिळणार नोटीस...मोºहळ येथील नलिनी तायडे, मोझरी येथील साहेबराव लोणाग्रे, पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड-गोपाल लोखंडे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, साईनगर- तुळशिदास मोरताळे, उद्धवराव देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे, गावंडगाव- के.डी. चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या जाणार आहेत. 

मुख्याध्यापकांचे काय झाले..रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांचीही तपासणी झाली. त्यानंतर पुढे काय झाले, याचा अहवाल अद्यापही स्पष्ट झालेला नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदTeacherशिक्षकEducationशिक्षण