शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जंगलाचाही ‘सात-बारा’!

By admin | Updated: January 20, 2015 23:45 IST

प्राण्यांचा अधिवास, जंगलात मानवाच्या हस्तक्षेपासह सर्वच बाबींची माहिती.

सचिन राऊत / अकोला - प्रादेशिक वनविभाग, वन्यजीव विभाग आणि वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जंगलांचा सात-बारा तयार करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मालमत्तेची संपूर्ण माहिती सात-बारावरून मिळते, तशाच प्रकारे जंगलांची संपूर्ण माहिती या सात-बारावर राहील. यामध्ये प्राण्यांच्या अधिवास ठिकाणांचे अक्षांश-रेखांश, वनाचा प्रकार, वनाची घनता यांसह मानवाचा हस्तक्षेप या बाबी नोंदवल्या जाणार आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. वनविभाग, वन्यजीव विभाग आणि वनविकास महामंडळाच्या जंगलांमध्ये या आधी केवळ वाघांची गणना करण्यात येत होती; मात्र जानेवारी २0१४ मध्ये राज्यातील संपूर्ण वनविभागाच्या जंगलांमध्ये नव्या पद्धतीने गणना करण्यात आली. यासाठी नवीन आणि वेगळ्याच पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निर्धारित वनक्षेत्रात आढळलेल्या तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची गणना तर केलीच, शिवाय वनक्षेत्रातील वनस्पती, जमिनीवरील वनाच्छादन, झाडोरा, जंगलात मानवी हस्तक्षेप किती प्रमाणात आहे, याची नोंददेखील घेण्यात आली आहे. तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेचा अभ्यास याचा नव्या पद्धतीत समावेश करण्यात आला. ही संपूर्ण माहिती वनविभागाकडून संगणकावर अद्यावत करण्यात येणार आहे. जानेवारी २0१४ मध्ये जंगलाच्या सात-बारासोबतच संपूर्ण जंगलांचे निरीक्षण करण्यात आले असून, त्याचे संगणकाद्वारे विश्लेषणाचे काम अंतीम टप्प्यात आहे. जीपीएस प्रणाली सोबत ठेवून एका प्रपत्रात ही माहिती भरण्याचे कामकाज करण्यात आले आहे. या प्रपत्रामध्ये प्राण्यांच्या अधिवास ठिकाणाच्या वनाची घनता, भूप्रदेश, हवामान याची माहिती घेण्यात आली आहे. जंगलाच्या परिसरातील चराई करणारे, गुराखी व इतर गवतांचे प्रकार, लहान वनस्पती, पालापाचोळा, तृणभक्षी प्राण्यांची विष्ठा याची नोंद घेण्यात आलेली आहे.