शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरातील २२४१ औषध दुकानांचे परवाने रद्द

By admin | Updated: June 19, 2015 02:29 IST

नियमांचे उल्लंघन भोवले; १८५७ परवाने निलंबित.

अकोला: सर्व नियमांना धाब्यावर बसवून औषधांची विक्री करून औषधे व सौंदर्यप्रसाधन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या राज्यभरातील २२४१ किरकोळ औषध दुकानांचे परवाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) रद्द करण्यात आले आहेत. तसेच १८५७ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून एप्रिल २0१४ ते फेब्रुवारी २0१५ दरम्यान करण्यात आलेल्या या धडक कारवाईने नियमांचे उल्लंघन करणार्‍या औषध विक्रेत्यांना चाप बसला आहे. राज्यभरात प्रतिजैवके अर्थात अँटिबायोटिक्सचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे, औषध दुकानांसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने ठरवून दिलेले निकष न पाळणे, यासारखे प्रकार वाढीस लागल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील २४१९३ औषध दुकानांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक औषध विक्रेत्यांकडून नियमाला बगल दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ह्यएफडीएह्णने ४५0३ औषध दुकानांच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर ह्यएफडीएह्णने यापैकी २२४१ औषध दुकानांचे परवाने रद्द केले, तर १८५७ दुकानांचे परवाने निलंबित केले. मोठय़ा शहरांमध्ये स्वत:च्या मर्जीने औषधे घेण्याचे प्रमाण वाढत असून, औषधांची ऑनलाइन विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर ह्यएफडीएह्णकडून झालेली ही कारवाई स्वागतार्ह आहे. २0१३-१४ मध्ये ५४५२ परवाने रद्द अँन्टीबायोटिक्स औषधांची नियमबाहय़ विक्री करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने वर्ष २0१३-१४ मध्ये राज्यभरात विभागनिहाय धाडी टाकून ५४५२ किरकोळ औषध दुकानांचे परवाने रद्द, तर ३१७८ दुकानांचे परवाने निलंबित केले होते. यामध्ये कोकण विभाग १३८४, बृहन्मुंबई विभाग ९0१, पुणे विभाग ८९६, औरंगाबाद विभाग ८0१, नाशिक विभाग ६१२, अमरावती विभाग ४८९ व नागपूर विभागातील ३६९ दुकानांचा समावेश आहे.