२७ कोटींच्या जलवाहिनीसाठी मनपाचा पाठपुरावा

By Admin | Updated: May 25, 2015 02:20 IST2015-05-25T02:20:27+5:302015-05-25T02:20:27+5:30

मंत्र्यांची सूचना; आधी प्रस्ताव मंजूर करा नंतर पाहू!

Follow-up for pursuing 27 crores water channel | २७ कोटींच्या जलवाहिनीसाठी मनपाचा पाठपुरावा

२७ कोटींच्या जलवाहिनीसाठी मनपाचा पाठपुरावा

अकोला: मोर्णा प्रकल्पातून काटेपूर्णा प्रकल्पात पाणी आणण्यासाठी २७ कोटी रुपये किमतीच्या जलवाहिनीचा प्रस्ताव आधी सभागृहात मंजूर करा. यामध्ये दहा टक्के लोकवर्गणी जमा करण्याची अट मान्य असेल तर प्रस्तावाचा विचार केला जाईल, असे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित बैठकीत स्पष्ट केले. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) वरिष्ठ अधिकार्‍यांसह महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित होते. अकोला शहराला महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जलसाठय़ाची उपलब्धता आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, मनपा प्रशासन मोर्णा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने मोर्णा ते काटेपूर्णा प्रकल्पादरम्यान नवीन ५00 व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शासनानेसुद्धा जलवाहिनीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याने प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केला. आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली असता, त्यांनी आधी सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना आयुक्त सोमनाथ शेटे यांना दिली. सभागृहात प्रस्ताव मान्य झाल्यानंतर आणि लोकवर्गणीची अट मान्य असल्यास पुढील विचार केला जाईल, असे पाणीपुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मोर्णा ते काटेपूर्णा प्रकल्पापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाबाबत महापालिका कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. येत्या २७ मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत हा प्रस्ताव मांडल्या गेला आणि मंजूर झाला तर या प्रस्तावाची पुढील वाटचाल सुरू होईल

Web Title: Follow-up for pursuing 27 crores water channel