शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

फुलांच्या बाजारात मंदी कायम

By admin | Updated: May 11, 2014 22:52 IST

विवाह समारंभांचा परिणाम नाही;हारांची किंमतही कमी

अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात फुलांचे भाव गगनाला भिडतात. मात्र यावर्षी फुलांच्या बाजारात मंदी कायम असल्यामुळे शेतकरी व फूल विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. ग्राहकांना मात्र याचा फायदा होत आहे.
उन्हाळ्यामध्ये लग्नांची धूम असल्यामुळे फुलांना चांगलीच मागणी असते. या सिझनमध्ये शेतकरी व फूल विक्रेते लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. मात्र यावर्षी उन्हाळ्यातही फूल बाजारात मंदी आहे. लग्नाच्या कमी तिथी, यासोबतच फुलांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही वाढली आहे. तसेच अन्य राज्यातून फुलांची आयातही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे फुलांचा तुटवडा भासत नाही. परिणामी मागणी एवढे फूल सहज उपलब्ध होतात. ज्या दिवशी लग्नाची तिथ असते, त्यादिवशी फुलांना चांगला भाव असतो. इतर दिवस मात्र फुलांचे भाव नेहमीप्रमाणेच असतात. ग्लायडर फूल व गुलाबाच्या फुलांना अन्य फुलांच्या तुलनेत जास्त मागणी असल्यामुळे या फुलांचे भाव वाढले आहेत. लग्नाचे हार, पाणेरीच्या हारांना बरीच मागणी असते. मात्र, दरवर्षी फुलांची आवक कमी असल्यामुळे फूलविक्रेते अव्वाच्या सव्वा भावात विकतात. यावर्षी मात्र या हारांची किंमतही कमी आहे.