शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेचा पूर दुसर्‍या दिवशीही कायम

By admin | Updated: July 25, 2014 00:19 IST

येरळी पुलावरुन आठ फूट पाणी, खिरोडा पुलावरुनही वाहतूक बंदच

जळगाव जामोद : तालुक्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्याचा संपर्क तुटला असून पुलावरुन आज २४ जुलै रोजी संध्याकाळी ८ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे आजही संपूर्ण दिवसभर जळगाव, नांदुरा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे जळगाव जामोद आगाराने सर्व बसफेर्‍या मुक्ताईनगर मार्गे वळविल्या आहेत. २२ जुलैच्या रात्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. त्यामुळे २३ जुलै रोजी पूर्णानदी दुथळी भरुन वाहू लागली. त्यामुळे मानेगाव जवळचा पूल पाण्याखाली येवून वाहतूक थांबली होती. तो पूर आज उतरण्याची शक्यता होती मात्र अकोला, अमरावती जिल्ह्यातून येणारे पाणी त्यातच धरणातील पाण्याचा विसर्ग होत असल्याने आज पूर्णा खाली झाली नाही. तसेच वाण धरणाचे सुध्दा चार दरवाजे उघडल्याने पूर्णेचा पूर स्थिर आहे. हा मार्ग नांदुरा, खामगाव, अकोला, बुलडाणा येथे जाण्यास सोयीचा आहे. मात्र पुरांमुळे प्रवाशांना १00 किमी अंतराचा फेरा घेवून मुक्ताईनगर मार्गे जावे लागत असल्याने प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. तसेच वेळ सुध्दा खर्ची जात आहे. उलट जळगाव आगाराला मात्र या पूरपरिस्थितीचे काळात आर्थिक फायदा होतो आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी जाणे, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार्‍या विद्यार्थ्यांना मात्र त्रास होत आहे. तर व्यापार्‍यांनाही आर्थिक भूर्दंड बसत आहे. अनेकांना अत्यावश्यक कामासाठी जाणे असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. येरळी येथे या पूर्णानदीवर नवीन पुलाचे बांधकाम चालू आहे. मात्र सदर बांधकाम निधीअभावी संथगतीने सुरु असल्याची माहिती असून शासनाने त्यावर तात्काळ निधीची तजवीज करुन पुलाचे काम पूर्ण करावे व या तालुक्यातील जनतेची दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.