शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजारात चढ-उतार!

By admin | Updated: October 18, 2014 00:55 IST

आता कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न; अकोला पूर्वमधील उमेदवारांना सर्वात कमी भाव

अकोला: विधानसभा निवडणुकीची धुमश्‍चक्री १५ ऑक्टोबरनंतर शांत झाली असून, आता कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीतून मिळणार्‍या दिलाशामुळेच प्रमुख उमेदवारांमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या बहुरंगी लढतींमुळे निकालाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नसून, सट्टा बाजारातील भावांमध्ये चढ-उतार होत आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीमधील घटस्फोट, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी, भारिप-बहुजन महासंघाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आदींमुळे जिल्हयातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, मूर्तिजापूर आणि बाळापूर या पाचही मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. परिणामी, निकालांचे आडाखे बांधण्यात मतदार, कार्यकर्ते, तथा राजकीय जाणकारांसह सटोडियेही गोंधळात असल्याचेच पाहवयास मिळत आहे. सट्टा बाजार आणि विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात सर्वात जास्त जागांवर भाजप उमेदवार विजयी होणार आहेत. *नेमके काय सुरू आहे सट्टाबाजारातयावेळच्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम आणि अकोला पूर्वमधील उमेदवारांना सर्वात कमी भाव दिला जात आहे. भाव कमी असलेल्या उमेदवारांची विजयाची खात्री सर्वाधिक असते. अकोला पश्‍चिममधील भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांना बुधवारी १३ पैसे भाव दिल्या गेला. मात्र गुरुवारी १५ पैसे आणि शुक्रवारी २५ पैसे भाव दिल्या गेला. *विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघातही चौरंगी लढत झाली. या मतदारसंघात बुधवारी भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर आणि भारिप-बमंसचे हरिदास भदे यांना प्रत्येकी ९0 पैसे भाव दिल्या गेला. मात्र शुक्रवारी भदे यांना ९३ तर सावरकर यांच्यावर ८0 पैसे भाव लावण्यात आला.