शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या धुराने श्‍वास कोंडला!

By admin | Updated: October 26, 2014 00:45 IST

वायू प्रदूषणामुळे श्‍वसन व घशाचे आजार, कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले.

सचिन राऊत /अकोलादीपोत्सवाच्या दोन दिवसांमध्ये शहरासह जिल्हय़ात प्रचंड आतषबाजी करण्यात आली असून, यामधून निघालेल्या धुराने आणि शनिवारी दिवसभरातील रिमझिम पावसाने श्‍वसनाचा त्रास वाढला आहे. घसाच्या आजार जडला असून व अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवू लागला आहे. फटाक्यांच्या धुरामूळे हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. या धुराने ह्यब्रांकायटीसह्ण, जीव गुदमरणे, अस्थमा, दम लागणे अशा प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असून, घशामध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.दिवाळीच्या उत्साहात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करण्यात आली असून, यामधून निघालेल्या धुराने ह्यसल्फर डाय ऑक्साईडह्य, ह्यकार्बन मोनाक्साईडह्य आणि ह्यफॉस्फरसह्णचे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. फटाक्यांमधून निघालेल्या धुरातून विविध घातक रसायन निघत असून, त्यामुळे हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. हवेत सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईडचे प्रमाणात वाढ झाल्याने प्रदुषित झालेल्या हवेने श्‍वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. याचा त्रास लहान मुले व वृद्धांना अधिक प्रमाणात होत आहे. फटाक्यातील प्रदूषित धुरामूळे ब्रांकायटीस, रायनायटीस, फॅटींगजायटी या सारखे आजार वाढले असून, अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अँलर्जीक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारखे विकार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांच्या श्‍वसननलिका अत्यंत नाजुक असल्याने त्यांना या घातक धुराने अधिक धोका असून कायमस्वरुपी श्‍वसनाचा आजार जडण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच अस्थमाचा त्रास असलेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अँटॅक येण्याची दाट शक्यता असल्याचा धोकाही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दमा, अस्थमा व अँलर्जीक त्रास असलेल्यांचा श्‍वास फटाक्यांच्या धुरामुळे कोंडल्या गेला आहे. दाट वस्तीत असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.फटाक्यांमधून निघणारा धुरामुळे प्रचंड प्रदूषण होत असून, त्यामुळे श्‍वसनाचे व हृदयाचे विकार वाढतात. यावर उपाय म्हणून नागरिकांनी फटाक्यांचा धूर नाका-तोंडात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शक्य असेल तर फटाके फोडणे टाळण्यचा सल्ला श्‍वसन विकार व श्‍वसननलिका दुर्बिण तज्ज्ञडॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी दिला.