शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडातील पिकांवर आता धुक्याचे संकट!

By admin | Updated: January 3, 2015 00:46 IST

शेतकरी हवालदिल; धुक्यामुळे हरभरा, गहू संकटात.

ब्रम्हानंद जाधव/मेहकरआद्र्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील हरभरा, गहू या पिकांसह कांदा, फुलकोबी ही भाजिपालावर्गीय पिकेही धोक्यात आली आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांना पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामात झळ सोसावी लागली होती. अत्यल्प पावसामुळे यावर्षी रब्बी पेरणीचे क्षेत्रही घटले. ओलिताची सोय असलेले शेतकरीच रब्बी पेरणी करू शकले. कोरडवाहू शेती असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी रब्बी पेरणीला बगल दिली. त्यामुळे पश्‍चिम वर्‍हाडात ५ लाख ५५ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावरच रब्बी पेरणी झालेली आहे. त्यापैकी सर्वाधिक २ लाख १२ हजार २८१ हेक्टर क्षेत्रावर हरभरा असून, ७६ हजार ५३८ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा आहे. थोड्याबहुत प्रमाणात कांदा, फुलकोबी या भाजिपालावर्गीय पिकांचाही समावेश आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात गत तीन ते चार दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून, आद्र्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हरभरा व गहू पिकाची फुले करपून जात आहेत. यामुळे गव्हावर तांबेरा रोगाचे आक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. कांदा पिकाची फुले करपून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, फुलकोबीवर लारव्हल अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पश्‍चिम वर्‍हाडात रब्बी पेरणीच्या सुरूवातीला अत्यल्प पावसामुळे तूर पिकाला फटका बसला. आता काही ठिकाणी अवकाळी, तर काही ठिकाणी गारपीटीचा तडाखा बसल्याने हरभरा व गहू पिकाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. *उत्पादनात ६५ टक्के घट आद्र्रतायुक्त धुक्यामुळे हरभरा, गहू, कांदा, फुलकोबी या पिकांचे उत्पादन साधारणत: ६0 ते ६५ टक्के घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. *३ लाख हेक्टरवरील पिके धोक्यातपश्‍चिम वर्‍हाडात एकूण ५ लाख ५५ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गहू ५१ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर, तर हरभरा १ लाख १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर आहे. अकोला जिल्ह्यात गहू ५ हजार ८३७ हेक्टर क्षेत्रावर आणि हरभरा ४५ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर आहे. वाशिम जिल्ह्यात गहू १८ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रावर, तर हरभरा ५0 हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर आहे. पश्‍चिम वर्‍हाडात एकूण २ लाख ८८ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि हरभरा धुक्यामुळे धोक्यात आला आहे.