शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांनी तिफण काढली!

By admin | Updated: June 13, 2017 01:43 IST

पेरणीची तयारी, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागील आठवड्यापासून विदर्भात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून,अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची तिफण काढली आहे. अकोला जिल्ह्यात तर तुरळक ठिकाणी शेतक ऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे.विदर्भात जवळपास ४९ लाख हेक्टरच्यावर खरीप हंगामाचे क्षेत्र असून,यात पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरचा समावेश आहे. यावर्षी पावसाचे चित्र समाधानकारक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. सार्वत्रिक मोसमी पावसाने राज्यात प्रवेश केला आहे. सार्वत्रिक पावसाच्या अगोदरच अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याच पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची बियाणे बाजारात काही प्रमाणात लगबग वाढली आहे. आतापर्यंत एकूण उपलब्ध बियाण्यांपैकी २५ टक्केच्यावर बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल केले आहे. काही शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भात यावर्षी ३२ लाख हेक्टरपैकी अर्ध्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे; परंतु गतवर्षीच्या तुलनेत ते १० टक्के कमी असेल, असे कृषी विभागाने नियोजन केले आहे. कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता. यावर्षी बीटी कापसासोबतच देशी कापसाचा पेरा वाढणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस तज्ज्ञांचे मत आहे. मागीलवर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असून, दरही चांगले होते. कापूस क्षेत्र वाढण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण सांगितले जात आहे. तुरीचे क्षेत्र मात्र कमी होेण्याची शक्यता कृषी विभाग वर्तवित आहे. मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर व अकोला तालुक्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. अकोला, अकोट व तेल्हारा तालुक्यातील तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी मूग, उडीद पिकांची पेरणी सुरू केली आहे.यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसे संकेतही दिसत आहेत. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने काही तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरू वात केली आहे. यावर्षी बियाणे, खतेही मुबलक आहेत.-एस.आर. सरदार, संयुक्त कृषी संचालक,कृषी विभाग,अमरावती.