शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

दाजिर्लिंगची अनुभूती ‘वान’मध्ये

By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST

अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळे.

डॉ. किरण वाघमारे / अकोला
भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाजिर्लिंगचा अनुभव कोणाला नकोसा असणार आहे; परंतु दाजिर्लिंगला जाणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. पुरेसी फुरसत आणि आर्थिक परिस्थिती असली तरच दाजिर्लिंग जाणे शक्य आहे; परंतु दाजिर्लिंगसारखाच अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या गावापासून जवळच वान आहे. अकोल्यापासून अवघ्या ७५ कि.मी. वर असलेले वान पर्यटनस्थळ आ पल्याला दाजिर्लिंगचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही.
आकोटपासून ३0 कि.मी. अंतरावर असलेल्या वानला निसर्गाची भरपूर श्रीमंती लाभली आहे. सातपुड्याच्या डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या वानची समुद्रसपाटीपासून उंची ४३२ मीटर आहे. २११ चौरच कि.मी. परिक्षेत्रात पसरलेले वान अभयारण्य पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनू पाहत आहे. वानला जायचे तर खरी मजा रेल्वे प्रवासातच आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून वानकडे जाण्यासाठी मीटरगेज रेल्वे आहे. छोट्या गाडीने पावसाळ्यात प्रवास करताना सर्वदूर पसरलेला हिरवा निसर्ग, भुरभुर पडणारा पाऊस, मध्येच दिसणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि डोंगराच्या पाय थ्याशी असलेली छोटी-छोटी गावे पाहिली की, आपण दाजिर्लिंगच्या रेल्वेत प्रवास करीत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. अकोला-खंडवा रेल्वे मार्गावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वानला जाण्यासाठी मोटारीचादेखील मार्ग आहे; परंतु रेल्वेने जाण्याची मजा काही औरच. वानरोड रेल्वेस्थानकदेखील निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. या छोट्याशा स्टेशनवर उतरल्याबरोबर आपल्या मनाला आनंद मिळतो. स्टेशनच्या चारही बाजूला हिरव्यागार टेकड्या पहावयास मिळतात.
वानला जाणारा रेल्वे मार्ग दर्‍याखोर्‍यातून घाट पार करीत जातो. या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा मार्ग इंग्रजी चारच्या आकड्याप्रमाणे आहे. वानचा हा चारचा आकडा सर्वदूर प्रसिद्ध आहे. अशाप्रकारे वळण मार्ग असलेला हा जगातील एकमेव रेल्वेमार्ग आहे. हा रेल्वेमार्ग अनुभवण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने वानला येतात. वान रेल्वे स्थानकावरून पाऊलवाटेने थोडेसे वर चढले की, वान पर्यटन संकुलाजवळ आपण जाऊन पोहोचतो. येथे पर्यटकांना थांबण्यासाठी आकोट वनविभागाच्यावतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. नैसर्गिक जीवनाचा आनंद घेता यावा, याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या झोपड्या येथे पर्यटकांसाठी उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्या संपूर्णपणे माती व लाकडाचा उपयोग करून बांधण्यात आल्या आहेत. भिंतीवरील नक्षीकाम पूर्णपणे आदिवासी कलाशैलीचे दर्शन घडवि ते.
झोपड्याशिवाय तीन कापडी तंबू पर्यटकांसाठी येथे आहेत. एकाचवेळी १२ लोक राहू शकतील, असा मोठा तंबूदेखील येथे आहे. भोजनाचीही व्यवस्था आधी सांगितल्यास येथे केली जाते. वाचनप्रेमींसाठी येथे ग्रंथालय आहे, लाकडापासून बनविलेला मीटिंग हॉल, वन व वन्य जीवासंदर्भात माहिती जाणून घेण्याकरिता, माहितीपट पाहण्याकरिता नैसर्गिक थिएटर, प्राणी रक्षणासाठी उंच मनोरा, फुलझाडांनी बहरलेली छोटी पण सुंदर बाग येथे निर्माण करण्यात आली आहे. वानमध्ये पर्यटकांना आनंद देण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. रॅपलिंग करू इच्छिणार्‍यांसाठी उंच कडा आहे, दुधाप्रमाणे शुभ्र पाणी असणारे धबधबे आहेत, खळखळ वाहणारी वान नदी, उंच व हिरव्या वनराईने नटलेल्या टेकड्या, रंगबिरंगी फुलपाखरांचे उडणारे थवे, पक्ष्यांचे मंजुळ आवाज, थंड पण आल्हाददायक वारा आणि सरसर बरसणार्‍या श्रावण सरी हे सर्व धुंद करणारे वा तावरण मनाला मोहून टाकतं. वानला गेल्यावर संपूर्ण थकवा नष्ट होऊन शरीर आणि मन ताजेतवाने होते. तर मग पावसाळ्यातील एक दिवस वानला जाऊन यायला काय हरकत आहे.