शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तर पोलीस क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

By admin | Updated: August 23, 2016 00:59 IST

अकोला जिल्ह्यातील १0३ खेळाडूंचा सहभाग; तीन दिवस चालणार स्पर्धा.

अकोला, दि. २२: पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये २0 महिला व ८३ पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धेत सहभागी पाच संघांच्या पथसंचलनाने झाली. पोलीस बॅण्ड पथकाच्या वाद्यवृंदाने देशभक्तीपर सुरेल धून वाजवून पथसंचलनाला साथ दिली. आरपीआय विकास तिडके यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. मुख्यालय संघाचे नेतृत्व शेषराव ठाकरे व अँथलिट मिताली राऊत यांनी केले. शहर विभागाचे नेतृत्व अँथलिट सय्यद आरीफ व राष्ट्रीय बास्केटबॉलपटू पूजा मंडाईतकडे होते. मूर्तिजापूर विभाग संघाने अँथलिट काकड व मीना धाबे यांच्या नेतृत्वात पथसंचलन केले. अकोला विभागाचे नेतृत्व कुस्तीगीर विजय दाते व अँथलिट पूजा वानखडे यांनी केले. बाळापूरचे नेतृत्व हॉकीपटू सुनील पाताडे व कबड्डीपटू वनिता खंडेराव यांनी केले. यानंतर गतवर्षी बेस्ट प्लेअर ठरलेले खेळाडू इम्रान आणि भाग्यश्री मेसरे यांनी क्रीडा मशाल मैदानाच्या चौफेर फिरू न प्रमुख अतिथींच्या जवळ दिली. चंद्रकिशोर मीणा व विजयकांत सागर यांच्याकडे मशाल सुपूर्द करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्रास्ताविक विजयकांत सागर यांनी केले. तीन दिवसीय या स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बास्केटबॉल आदी खेळांचे सामने होणार असून, स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडू व संघाची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात येणार असल्याचे सागर यांनी सांगितले.      मनात न्यूनगंड न बाळगता धैर्याने प्रत्येक गोष्टींचा सामना केल्यास निश्‍चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, अशा शब्दात मीना यांनी पोलीस खेळाडूंना मार्गदर्शन केले. यानंतर पोलीस क्रीडा स्पर्धा-२0१६ चे उद्घाटन झाल्याचे मीणा यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय फुटबॉलपटू संजय पटेकर यांनी केले.