शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

युरोपीयन रोलर पक्ष्यांचा अकोला परिसरात मुक्काम

By admin | Updated: October 27, 2014 01:18 IST

हिवाळ्याची चाहूल: स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात.

विवेक चांदूरकर/अकोलागत आठ दिवसांपासून थंडी जाणवत असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या प्रारंभापासून देश-विदेशातून भारतात स्थलांतर करून येणारे पाहुणे पक्षी परिसरातील जंगलामध्ये व पाणवठय़ावर दिसू लागतात. यामध्ये युरोपमधून व उत्तरेकडील मंगोलिया, सायबेरिया, रशिया, चीन, तिबेट आदी देशांमधून येणारे बदक, दलदलीतील वेडर्स यांची संख्या मोठी असते. सध्या पाणवठय़ांवर येणारे बदक व करकोचे हे पक्षी अजून पोहोचले नसले तरी काही वेडर्स व जंगलात येणारे छोटे पक्षी यांचे आगमन झाले आहे. आपल्या भागात स्थलांतराचा काळ न घालविणारा व फक्त प्रवासादरम्यान दिसणारा युरो पीयन रोलर सध्या अकोला परिसर व विदर्भामध्ये तात्पुरता निवार्‍यासाठी थांबलेला आहे. हिमालयातून युरोप व द. आफ्रिकेमध्ये विणीसाठी स्थलांतर करून जाणारा हा पक्षी यावेळी तेथून मोठे झालेल्या पिल्लांना घेऊन हिमालयाकडे परतीच्या प्रवासास निघतो व ऑ क्टोबरदरम्यान काही काळ तो विदर्भामध्ये आढळून येतो. अमरावतीची वाईल्ड लाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझर्वेशन सोसायटी (डब्ल्यूईसीएस/वेक्स) ही संस्था विदर्भातील पक्ष्यांचा अभ्यास करीत असून, या अंतर्गत संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे व निनाद अभंग यांनी अकोला परिसरामध्ये त्यांना एकूण १६ युरोपीन रोलर आढळून आले. या पैकी १२ पक्षी हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात निदर्शनास पडले. या शिवाय सँडपायपर, रेड शांक, ग्रीन शांक मागील वर्षी प्रथमच नोंद केलेला रफ, रेड स्टार्ट, रेड थ्रोटेड, फ्लायकॅचर आदींचेही आगमन झाल्याचे दिसून आले आहे. बदक, करकोचे, कौच आदी प्रकारातील पक्ष्यांचे लवकरच आगमन होणार असल्याची माहिती वेक्सचे सचिव डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार अकोला परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी घेत आहेत. युरोपीयन रोलर हा पक्षी आणखी आठ दिवस राहण्याची शक्यता आहे.