प्रमुख मार्गांवर जड व मालवाहू वाहतुकीस पुन्हा प्रवेश बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:52 IST2019-11-09T12:52:14+5:302019-11-09T12:52:21+5:30

अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते.

Entry of heavy and freight traffic on major routes is banned! | प्रमुख मार्गांवर जड व मालवाहू वाहतुकीस पुन्हा प्रवेश बंदी!

प्रमुख मार्गांवर जड व मालवाहू वाहतुकीस पुन्हा प्रवेश बंदी!

अकोला: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातही जड व मालवाहू वाहतूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीचे नियंत्रण करता यावे आणि जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, या दृष्टिकोनातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी पुन्हा शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतुकीस तीन महिन्यांसाठी बंदी घातली आहे.
अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. या रस्त्यांवर जड व मालवाहू वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या मार्गांवर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बँक, धार्मिक स्थळे आणि प्रतिष्ठाने असल्यामुळे मोठी वर्दळ असते. त्यात जड वाहतूकही होत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अपघातसुद्धा घडतात. बाजारपेठेच्या परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ग्राहकांची व व्यापारी वर्गाच्या मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होते. त्यामुळे बाजारपेठेच्या परिसरात सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी व खरेदी-विक्रीसाठी जाणे-येणेसुद्धा अवघड होते. या मार्गांवरील रहदारी सुरळीत करण्यासाठी ४ नोव्हेंबर २0१९ ते ३ फेब्रुवारी २0२0 या कालावधीत शालिनी टॉकीज ते अकोट स्टॅन्ड, दगडी पूल ते माळीपुरा चौक, अकोट स्टॅन्डकडून सिटी कोतवाली चौकाकडे येणारा मार्ग, अकोट स्टॅन्ड ते अग्रेसन चौकाकडे येणारा मार्ग, अग्रेसन चौक ते बाजारपेठेत जाणारा मार्ग, टॉवर चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्याकडून दामले चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, बाळापूर नाक्याकडून शहरात येणारा मार्ग, वाशिम बायपासकडून शहरात येणारा मार्ग, डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाºया मार्गावर मालवाहू व जड वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Entry of heavy and freight traffic on major routes is banned!