कृषी विद्यापीठाचे कर्मचारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:30 AM2017-09-18T01:30:06+5:302017-09-18T01:30:27+5:30

‘समान काम, समान वेतन’ लागू करू न,  थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील  एक महिन्यापासून कामबंद आंदोलन पुकारले असून, १0 स प्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उ पोषणाचा हा सातवा दिवस असल्याने कर्मचार्‍यांची प्रकृती  खालावली आहे. पण त्यांची अद्याप कोणी दखल घेतली  नसल्याचे चित्र आहे.

Employees of Agricultural University | कृषी विद्यापीठाचे कर्मचारी बेदखल

कृषी विद्यापीठाचे कर्मचारी बेदखल

Next
ठळक मुद्दे‘समान काम, समान वेतन’ लागू करण्याची मागणीकर्मचार्‍यांनी एक महिन्यापासून पुकारले आहे कामबंद  आंदोलन 

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न,  थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील  एक महिन्यापासून कामबंद आंदोलन पुकारले असून, १0 स प्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उ पोषणाचा हा सातवा दिवस असल्याने कर्मचार्‍यांची प्रकृती  खालावली आहे. पण त्यांची अद्याप कोणी दखल घेतली  नसल्याचे चित्र आहे.
विद्यापीठाच्या बाराही विभागातील रोजंदारी मजुरांनी कृषी  विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू   केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत  आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या  नेत्यांनी केला आहे. आता कर्मचार्‍यांनी बेमुदत उपोषणाला  सुरुवात केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये सुभाष सुरवाडे,  काशिनाथ मेश्राम व रमेश चक्रे या रोजंदारी कर्मचार्‍यांचा  समावेश आहे. 

Web Title: Employees of Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.