शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ: भाजपला इशारा; ‘वंचित’ला धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 2:35 PM

मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने एक जागा कायम ठेवत मित्रपक्ष शिवसेनेलाही विजयी केल्यामुळे महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण असणे साहजिकच आहे; मात्र या निकालासाठी मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे.अकोल्याच्या राजकारणाचा विचार केला तर गत तीन दशकांपासून भाजपाचा प्रभाव राजकारणावर आहे. नेते, महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते या सर्वांच्या अपेक्षांना तोंड देतानाच सर्वांना सत्तेत सामावून घेताना मोठी कसरत नेतृत्वाला करावी लागते. त्यामुळेच काही सत्ताकेंद्रांसाठी ठरलेलीच नावे कायम राहतात. एखाद दुसरा बदल केलाच तर त्याला दीर्घकाळ संधी मिळेल, अशी स्थिती नाही. परिणामी, भाजपामध्येच ‘पठारावस्था’ आली आहे. त्यामुळेच आलेला गाफीलपणा अन् अतिआत्मविश्वास या पक्षाला झुंज देण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होते. पराभवाची कारणे जशी अनेक असतात, तशी विजयाचीही कारणे आहेतच; मात्र जेव्हा विजयासाठी झुंज द्यावी लागते, त्यावेळी मात्र कारणांचा अर्थ समजून घेणे गरजेचे असते. गत पाच वर्षांच्या काळात अकोल्यात विकास कामे झाली, अजूनही सुरूच आहेत; मात्र त्यांच्या दर्जाबद्दल होणारी ओरड, त्याची घेतली जाणारी दखल अन् प्रत्यक्षातील कारवाई यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतर जनतेने दुर्लक्षित केले नाही. त्यामुळेच अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघांत विजयासाठी भाजपाला शेवटच्या फेरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याच मतदारसंघात भाजपाला सहज विजय मिळत आला आहे, हे विशेष. दुसरे म्हणजे पक्षातील छुपी गटबाजी, चुकीच्या गोष्टींची नेत्याकडून होणारी पाठराखण अशा अनेक मुद्यांच्या ऊहापोह करता येईल. मतदारांनी दिलेला इशारा व त्यामागील अर्थ लक्षात घेऊन पुढील कार्यकाळात सुधारणा झाली तर आजचे ‘अच्छे दिन’ कायमच ‘अच्छे दिन’ राहतील, अन्यथा ये पब्लिक है...!४अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना अकोल्याने नेहमीच ताकद दिली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता, प्रत्येक वेळी विधानसभेत प्रतिनिधित्व गत नऊ लोकसभा निवडणुकांपैकी १९९८ व १९९९ या दोन निवडणुकांमध्ये अ‍ॅड. आंबेडकरांना खासदार करणाऱ्या जिल्ह्यातच यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांची पाटी कोरी राहिली आहे. खरे तर ‘वंचित’साठी हा धक्का आहे.

वंचित’च्या निमित्ताने उभ्या महाराष्टÑात मतांच्या धु्रवीकरणासोबत सत्तेत सहभाग होईल, असे आश्वस्त करणारे वातावरण तयार झाले होते. त्याला मोठा सेटबॅक बसला आहे. त्यामुळे आता कोºया झालेल्या पाटीवर ‘वंचित’च्या माध्यमातून ते कोणते मुळाक्षरे गिरवितात, यावरच पक्षाची व वैचारिक चळवळीची दिशा ठरणार आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आता तरी धडा घेईल का?

भाजपा लाटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी अपवाद वगळता त्यांच्या उमेदवारांनी दिलेली लढत कार्यकर्त्यांना उभारी देणारी आहे. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला, तरच पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊ शकते. राष्टÑवादी काँग्रेसने बाळापूर व मूर्तिजापूर या दोन ठिकाणी निवडणूक लढविली. त्यापैकी बाळापुरात दारुण पराभव झाला, तर मूर्तिजापुरात तिसºया क्रमांकावर राहावे लागले. हे पाहता आता भविष्यात नव्याने पक्ष बांधणीची जबाबदारी पेलावी लागणार असून, नव्या नेतृत्वाला आतापासूनच ताकद देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019