अपहरणप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल

By Admin | Updated: May 26, 2015 02:09 IST2015-05-26T02:09:07+5:302015-05-26T02:09:07+5:30

भाजयुवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण प्रकरण.

Eight people have been arrested in the kidnapping case | अपहरणप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल

अपहरणप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल

मंगरुळपीर (जि. वाशिम): भारतीय जनता युवा मोर्चाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद जाधव यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली होती. याप्रकरणात पोलिसांनी विनोद जाधव यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. शेलूबाजारजवळील चिखली येथे विनोद जाधव यांना काही अज्ञात युवकांनी रविवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मारहाण करून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना बाश्रीटाकळी येथील रेल्वे रुळांवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत टाकून आरोपी पसार झाले होते. आरोपींमध्ये अनंता काळे, शेरूभाई फकीरावाले, इम्रान शेरूभाई फकीरावाले यांच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी विनोद जाधव यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध कलम ३0७, ३२५, ३४१, ३६४, ३९४, १२0 (ब) भादंविअन्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: Eight people have been arrested in the kidnapping case