शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी म्हणतात, मला घेणे-देणे नाही!

By admin | Updated: November 19, 2014 02:03 IST

शिक्षकांच्या आत्मदहनाचा इशारा गाजला अकोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत.

अकोला: जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंगळवारी शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले. दोन उर्दू शिक्षकांनी दिलेल्या आत्मदहनाचा इशारा सभेत चांगलाच गाजला. निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने आत्मदहनाच्या इशार्‍याबाबत मला काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगून शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने सभेत चांगलाच गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा मंगळवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या विषय पत्रिकेवर विषयांचा दुष्काळ असला तरी सदस्यांनी विविध विभागांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सभा चांगलीच गाजली. वाडेगाव येथील घरकुल योजना, टाकळी येथील सरपंचाने पदावर असताना घेतलेला घरकुला योजनेचा लाभ या प्रश्नांसोबतच शिक्षण विभागाच्या कारभारावर सदस्यांनी अधिकार्‍यांना कोंडीत पकडले. विशेषत: शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी शिक्षणाधिकार्‍यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना देता आली नाही. २0१२ पासून दोन उर्दू शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न गाजत आहे. या प्रश्नावर चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने आपला अहवालही सादर केला आहे. या अहवालावर काय कारवाई केली, याबाबत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणाधिकार्‍यांनी अहवालच बघितला नसल्याचे सभागृहाला सांगितले. विशेष म्हणजे, एकीकडे अहवाल बघितला नसल्याचे सांगून शिक्षणाधिकार्‍यांनी दुसरीकडे उर्दू शिक्षकांच्या आत्मदहनाच्या इशार्‍यानंतर शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन मागितल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी याबाबत मला काहीही घेणे देणे नाही, मला याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. समायोजनाबाबतही त्यांना उत्तर देता आले नाही. जिल्ह्यात ५५ शिक्षक अतिरिक्त असतानाही मूर्तिजापूरमध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाला नियुक्त करून घेण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पांडे गुरुजींनी केली. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सभेत गाजला.