शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

विविध संस्था, शाळांच्या एकत्रीकरणास शिक्षण संस्था चालकांचा विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:09 IST

शिक्षण संस्थांच्या शाळांचे एकत्रिकरण करून शिक्षण संस्था संपविण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तत्कालीन मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाने एकाच परिसरातील विविध शिक्षण संस्थांनी चालविलेल्या शाळांचे एकत्रिकरण करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने एक अभ्यासगट स्थापन केला आहे. शिक्षण संस्थांच्या शाळांचे एकत्रिकरण करून शिक्षण संस्था संपविण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.शिक्षणातील महत्त्वाच्या ३३ विषयांसाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय तत्कालिन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार अभ्यासगट स्थापन करण्यात आले असून, या अभ्यासगटांना आता शिक्षण क्षेत्रातूनच विरोध होऊ लागला आहे. राज्यामध्ये एकाच इमारतीमध्ये किंवा एकाच परिसरामध्ये एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा आणि वेगवेगळ्या संस्थांच्या शाळा चालविल्या जातात. या सर्व शाळा एकत्रित करण्याचा विचार पुढे आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच संस्थेच्या अनेक शाळा आहेत, तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून शाळा, महाविद्यालयेसुद्धा चालविले जातात. या शाळांमधील पटसंख्या घसरत आहे. शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे, ती शाळा दुसऱ्या मोठ्या शाळेमध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये विलीन करण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सी.जी. वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला. हा अभ्यासगट या शाळांचा अभ्यास करून शाळांचे एकत्रिकरण करायचे की नाही, याबाबतचा अहवाल शिक्षण आयुक्तालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतरच विविध संस्थांच्या शाळांच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे; परंतु शाळा एकत्रिकरणाचा विचार शिक्षण क्षेत्रासाठी घातक असून, शासनाला शाळा आणि शिक्षक संपवायचे आहेत, असा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.

शाळांच्या एकत्रिकरणास आमचा विरोध असून, मंगळवारी राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाची पुणे येथे बैठक आहे. शाळांचे एकत्रिकरण करून शासनाला ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणायची आहे. आरटीई कायद्याचे हे उल्लंघन आहे. शाळा एकत्रिकरणाचा निर्णय घेतला तर राज्यातील ७0 हजार शाळा बंद पडतील. त्यामुळे बहुजन समाजासह शेतकरी, शेतमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील.-विजय कौसल, जिल्हाध्यक्ष,शिक्षण संस्था संचालक मंडळ, अकोला

 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा