शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:29 IST

भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे.

अकोला: भाजप सरकारच्या काळात उद्योग, कारखाने बुडाले. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. जात-धर्माच्या आधारे निवडणूक लढविली जात आहे. कलम ३७0 रद्द केल्याचा मुद्याचा वापर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भाजप-सेना भुलथापा देणारे आहे. त्यामुळे जनतेने त्यांना थारा देऊ नये. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, असा हल्लाबोल आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी बाळापुरात चढविला.बाळापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी दुपारी बाळापुरातील बसस्थानकामागील मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजप-शिवसेना जाती, धर्माच्या आधारावर समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडत आहे. निवडणुका आल्या की, भाजप सरकार विकासाच्या मुद्यांवर बोलत नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केली जाते. असे सांगत, खासदार ओवेसी यांनी, सध्या देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जीएसटीमुळे व्यापार, उद्योगधंदे बुडत आहेत. बँका बंद पडत आहेत. महागाई वाढत आहे. भाजप सरकारला या देशाचा विकास नको आहे. त्यांना धर्माचा वापर करून जनतेमध्ये दहशत निर्माण करायची आहे. त्यामुळे जनतेने जात, धर्माचा विचार न करता, एमआयएमच्या उमेदवारांना साथ द्यावी. भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या भुलथापांना जनतेने थारा देऊ नये, असे आवाहन बाळापुरातील जनतेला केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019balapur-acबाळापूरAkolaअकोला