शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लेमन सिटीवर आर्थिक संकट !

By admin | Updated: November 18, 2016 03:00 IST

निर्यातक्षम लिंबाची बाजारपेठ कोसळली !

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १७- पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने शेती अर्थकारणावर याचा अधिक प्रभाव पडला आहे. भाजीपाला, फळांसारख्या नाशवंत वस्तूची खरेदी-विक्री कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्हा लिंबू उत्पादक जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच अकोला शहराला लेमन सिटी हे नाव पडले आहे; पण या लेमन सिटीवर आजमितीस आर्थिक संकट घोंगावत आहे.जिल्हय़ात लिंबू फळपिकाचे क्षेत्र हे ७५ हजार हेक्टरच्यावर होते; पण आजमितीस हे क्षेत्र २,४00 हेक्टरवर आले आहे. निर्यातक्षम दर्जाचे लिंबू उत्पादन येथे घेतले जाते. देशातील प्रत्येक प्रांतात वाडेगावचा लिंबू प्रसिद्ध आहे. दिल्ली,पंजाब, काश्मीरच्या बाजारपेठेत या लिंबची मोठी मागणी आहे, तसेच लिंबूवर प्रक्रिया करणारा राज्यातील पहिला कारखाना जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सुरू करण्यात आला होता; पण सुविधा आणि अनुदानाअभावी हा कारखाना बंद पडला. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.तशीच वाडेगाव येथे विदर्भातील मोठी लिंबूची बाजारपेठ आहे; पण पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटासारखीच अवकळा या लिंबूला आली आहे. व्यापार्‍याकडे पैसा नसल्याने मागील आठ दिवसांपासून येथील लिंबू खरेदी ठप्प पडली आहे. दररोज तीन ते चार हजार गोण्या उत्पादन आहे; परंतु कोणी घेणाराच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तीच परिस्थिती अकोला शहरातील बाजारात आहे. बाजारात सध्या तीनशे ते साडेतीनशे गोण्या लिंबूची आवक आहे. बाजारात एक किलो लिंबूची किंमत २0 ते २२ रुपये होती आता १४ ते १५ रुपयानेप्रमाणे लिंबू विकला जात आहे. एकूणच वाडेगाव आणि अकोला बाजारपेठ मिळून पाच ते दहा लाख रुपयाचे लिंबू खरेदी-विक्रीचे व्यवहार १0 ते २0 टक्कय़ावर आले आहेत. शेतकर्‍यांकडे पैसेच नसल्याने वाहतूक करणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांकडील लिंबू सडण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्याची अनिश्‍चितता, लिंबू उत्पादकाकडे होत असलेले शासनाचे दुर्लक्ष यामुळे अगोदरच लिंबूचे क्षेत्र घटले आहे. वाडेगाव जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीत काही क्षेत्र टिकवून ठेवले आहे; परंतु अचानक पैशाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने लिंबूची बाजारपेठ कोसळली असून, भाजीपाला, धान्य इतर सर्वच प्रकारचे व्यवहार ठप्प पडल्याने लेमन सिटीवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.पैशाचा तुटवडा आणि ग्राहक व शेतकरी, व्यापार्‍यांकडे पैसेच नसल्याने लिंबू खरेदी-विक्रीवर मोठे परिणाम झाले आहेत. बाजारात पाचशे, सातशे लिंबूच्या गोण्या येत होत्या. हे प्रमाण अध्र्यापेक्षा कमी झाले आहे. कोणी घेणाराच नसल्याने लिंबूचे दर कोसळले आहेत.- किशोर ढोमणे,लिंबू व्यापारी, जनता ठोक भाजीबाजार, अकोला.