शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय नाट्य कलाप्रेमींचा कोरोना विरोधात लढा; व्हिडीओ द्वारे होणार अभिनय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 10:24 IST

'घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा' या टॅग लाईन खाली वैदर्भीय कलावंतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा आयोजन करीत आहे.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: 'कोरोना'च्या संकटामुळे सर्वांनाच घरात थांबणं बंधनकारक आहे. त्याला कलाकार मंडळी ही अपवाद कशी असू शकतील.सर्व कलाकार घरीच बसलेले आहेत. परंतु, काहीही झालं तरी 'हाडाचा कलाकार' गप्प बसणं शक्य नाही.म्हणूनच कलेशी असणारी नाळ कायम राहावीआणि 'कोरोना'मुळे सतत घरी राहणं कुठेतरी सुसह्य आणि सुखकारक व्हावे, यासाठी वैदर्भीय कलाप्रेमी एक आगळीवेगळी संकल्पना राबवित आहे.'संकल्पना आमची आविष्कार तुमचा' 'घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा' या टॅग लाईन खाली वैदर्भीय कलावंतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा आयोजन करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यात व्हिडिओद्वारे कलावंतांना सादरीकरण पाठवायचे आहे .यामध्ये एकपात्री,नाट्यछटा आणि स्वगत या प्रकाराचा सहभाग असेल. तिन्ही पैकी एक सादरीकरण कलावंतांना पाठवायचे आहे. सादरीकरण वेळ - ५ ते ७ मिनिटे असावी. यासाठी विषयाचे बंधन नाही.प्रवेशिका व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल २०२० आहे. १४ एप्रिल हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापन दिन असल्याने यानिमित्ताने स्पधेर्चे आयोजन केले आहे.या स्पधेर्साठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सदरील चित्रीकरण हे कलाकारांच्या घरातीलच असावे. ही स्पर्धा महाराष्ट्रस्तर आहे. विजेता स्पर्धकास ३००१, २००१,१००१ अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन आणि ५०१ रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके व स्मतिचिन्ह तसेच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येईल . व्हिडिओ सोबत आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. नाटयपरिषद नागपुरच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर व्हिडीओ पाठवावे. नागपुरातील जेष्ठ कलावंत या स्पधेर्चे परीक्षण करतील. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरण सोहळ्यात सादरीकरण करावे लागणार आहे. नरेश गडेकर किशोर आयलवार संजय रहाटे स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.

‘नाट्य कलावंत आणि रसिकांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी 'घरीच थांबा.. घराबाहेर जाऊ नका. घरी थांबूनच रंगदेवतेची आराधना करावी.'प्रफुल्ल फरकसेअध्यक्षअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.नागपूर शाखा  

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक