शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अकोला जिल्ह्यात २३ हजार गरीब कुटुंबांना धान्याचे वितरण बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:45 AM

शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामातील पुरवठा विभागाच्या दिरंगाईत गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत अद्यापही पूर्ण करण्यात आले नसताना, जिल्ह्यात आधार ‘लिंक’ नसलेल्या २३ हजार १८५ गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नोव्हेंबरपासून ‘आॅफलाइन’ धान्याचे वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामातील पुरवठा विभागाच्या दिरंगाईत गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरमहा रास्त भावाने गहू, तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येत आहे. शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना जिल्ह्यातील १ हजार रास्त भाव दुकानांमधून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे २०१७ पासून सुरू असलेले काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण झाले नसताना, आधार ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील २३ हजार १८५ शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना ‘आॅफलाइन’ धान्याचे वितरण गत नोव्हेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आले. शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामात पुरवठा विभागाच्या दिरंगाईत आधार क्रमांक ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.त्यानुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत केव्हा पूर्ण होणार आणि आधार ‘लिंक’ नसलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पुरवठा विभागाकडे माहितीच नाही!आधार ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गत नोव्हेंबरपासून आॅफलाइन धान्याचे वितरण बंद करण्यात आले. यासंदर्भात १० डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.आधार क्रमांक ‘लिंक’ नसल्याच्या नावावर शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन धान्याचे वितरण बंद करण्यात आहे. हे अयोग्य असून, जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण करून धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तातडीने धान्याचे वितरण सुरू केले पाहिजे.- योगेश अग्रवाल,शहर अध्यक्ष,रास्त भाव दुकानदार संघटना, अकोला.शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील २३ हजार १८५ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन धान्याचे वितरण गत नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. आधार ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे आधार ‘लिंक’ नसलेल्या शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना पुरवठा विभागाने आधार ‘लिंक’ होईपर्यंत आॅफलाइन धान्य वितरित केले पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना.

 

टॅग्स :Akolaअकोला