शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना डोळ्यांचे आजार !

By admin | Updated: May 29, 2015 01:59 IST

वाढते तापमान धोकादायक; पश्‍चिम व-हाडातील १५ लाख जनावरांना उष्णतेचा फटका.

नाना हिवराळे / खामगाव (जि. बुलडाणा):हवामानातील बदल आणि वाढत्या उष्णतेचा मनुष्याबरोबर जनावरांनाही फटका बसत आहे. गत आठवड्यातील ४५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. यामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख जनावरांसाठी वाढते तापमान धोकादायक ठरत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांचे बळी जात आहे. यावर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चार्‍याची नासाडी झाली आहे. पुरेसा चारा जनावरांना उपलब्ध नसल्याने जनावरांमध्ये ह्यएह्ण व्हिटॅमिनची कमी जाणवत आहे. पोषक चार्‍याअभावी जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. गत आठवड्यापासून जनावरांना डोळ्याचे आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांच्या डोळ्यातील पाणी गळणे, बुबुळावरील पापुद्रा पांढरा होणे, जनावरे अशक्त आदी लक्षणे आढळून आली आहेत. लहान जनावरांप्रमाणेच मोठय़ा जनावरांचाही यामध्ये समावेश आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला जिल्हय़ात २ लाख ७७ हजार ८८१ जनावरे, वाशिम ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्हय़ात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरांचा समावेश आहे. जनावरांच्या डोळ्याच्या वाढत्या आजारामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. डोळ्याच्या आजारापासून वाचविण्यासाठी जनावरांना पोषक व पुरेसा चारा, व्हिटॅमिन ह्यएह्ण ची पावडर खाऊ घालणे, डोळे स्वच्छ पाण्याने धुणे व कपड्याने पुसून काढणे तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात औषधी टाकणे आदी उपाय करणे गरजेचे आहे. यासंदर्भात तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ एन एच बोहरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनावरांमध्ये डोळे सातत्याने गळणे, बुबुळावर पांढरा पापुद्रा निर्माण होणे अशी लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जनावरांना तपासणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची गरज व्यक्त केली.

*.तर जनावरांना अंधत्व !

       वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारच्या उपाययोजना करतो; मात्र जनावरांना २४ तासही उघड्यावर राहावे लागते. जनावरांच्या शरीराचे तापमान सरासरी १0१ अंश सेल्सिअस राहते; परंतु वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान वाढून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. बुबळ पांढरे होऊन रात्रंदिवस त्यामधून पाणी गळते. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरांना अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पशुधन विभागाचे म्हणणे आहे.