शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याअभावी आपत्ती व्यवस्थापनावर ‘आपत्ती’!

By admin | Updated: August 1, 2014 02:23 IST

अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची गरज

अकोला : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हा चर्चेचा विषय झाली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी, या यंत्रणेस अत्याधुनिक साहित्याची गरज असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी केलेल्या पाहणीतून उजेडात आले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव गाडले गेल्याची माहिती बुधवारी सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास कळल्यानंतर, आपत्ती व्यवस्थापनाची चमू १0.३0 वाजताच्या सुमारास गावात दाखल झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यक साहित्यासह घटनास्थळावर तातडीने पोहोचणे गरजेचे असते, यावर या घटनेच्यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. नैसर्गिक आपत्ती कधीही, कुठेही कोसळू शकते. आपत्ती व्यवस्थापन हे थेट लोकांच्या जीवन-मरणाशीच संबंधित आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी घेणे आता काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम राजकीय आणि प्रशासकीय ने तृत्वाची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र काय स्थिती आहे, याची पाहणी ह्यलोकमतह्ण चमूने बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर केली. यंत्रणेकडे आवश्यक साहित्य असले, तरी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी आणखी काही साहित्य गरजेचे असल्याचे यावेळी दिसून आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा समन्वयक एस.पी. साबळे यांनी अकोला तहसील कार्यालय परिसरात फायबर बोट ठेवण्यात आली असल्याची माहीती दिली. ही बोट वजनाने जड असून, आवश्यकता भासल्यास बोट वा परण्यात येते. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी या आवश्यक साहि त्याची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कायमस्वरुपी एक वाहन, १५0 लाईफ जॅकेट, १५0 लाईफ रिंग हे साहित्य आवश्यक आहे. यासाठी जून महिन्यातच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले.
*काय आढळले..?
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकमत चमूने बुधवारी रात्री १२.३0 वाजता. नियंत्रण कक्षाला भेटी दिली. यावेळी एस.पी. शेटे व आर. एस. निलपगारे उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ८. १0 वा. पुन्हा पाहणी केली असता चार कर्मचारी हजर होते.

*मनपाचा नैसर्गिक आपत्ती निवारण क क्ष वार्‍यावर !
अकोला : मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षासोब त समन्वय साधण्याची जबाबदारी मनपा अधिकार्‍यांना देऊन प्रत्यक्षात कारभार मात्र अग्निशमन विभागाकडे सोपविण्यात आला. सखल भागात पाणी साचल्यावर संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांनी दखल घेण्याची गरज आहे. तसे होत नसल्याने नागरिक त्रस्त असून, हा विभाग नेमक्या कोणत्या कामासाठी आहे, असा प्रश्न उ पस्थित होत आहे.
पावसाळ्य़ात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी मनपा प्रशासनाच्यावतीने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम, नगर रचना, विद्युत विभाग, शिक्षण, जलप्रदाय व अतिक्रमण विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षासोबत समन्वय साधून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करणे, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले. पाणी वाहून जाण्यासाठी मनपाने ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही काही भागात पाणी कायम आहे.