आदीवासी शाळेमध्ये सुरू केली डिजीटल क्लास रूम

By Admin | Updated: September 6, 2016 14:11 IST2016-09-06T14:11:14+5:302016-09-06T14:11:14+5:30

बुद्धीची देवता म्हणून ज्याला आपण पुजतो त्या ‘गणनायक गणपती’चा उत्सव येथील युवाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने साजरा केला.

Digital class room started in tribal school | आदीवासी शाळेमध्ये सुरू केली डिजीटल क्लास रूम

आदीवासी शाळेमध्ये सुरू केली डिजीटल क्लास रूम

>ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. ६ - बुद्धीची देवता म्हणून ज्याला आपण पुजतो त्या ‘गणनायक गणपती’चा उत्सव येथील युवाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने साजरा केला. गणेशोत्सवासाठी  वारेमाप खर्च न करता आदीवासी मुलांना नव्या प्रवाहाची ओळख करून देण्याचा संकल्प युवाराष्ट्रने केला. 
अकोट तालुक्यातील पोपटखेड  परिसरातील जनूना या आदीवासी गावाची निवड या कार्यकर्त्यानी केली.  प्रत्येक सदस्याला आपआपल्या खचार्तुन जमेल तेवढी बचत करून वर्गणी देण्याची विनंती वजा आवाहन केले.  या आवाहनाला तब्बल ७० च्या वर नागरीकांनी तत्काळ प्रतिसाद देत स्वच्छेने वर्गणी दिली.  
वर्गणीतून जनुना येथील आदिवासी कोरकू बालकांसाठी डिजिटल क्लासरूमची उभारणीचा प्रारंभ केला. जवळपास दिड लाख खर्चातुन या शाळेची रंगरंगोटी, संगणक, प्राजेक्टर, पंखे, सातव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे सॉप्टवेअर, होम थियेटर अशा स्वरूपात डिजीटल क्लासरुम आकारास आली आहे. 
विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ.निलेश पाटील, धनंजय मिश्रा आदींनी या कामासाठी पुढाकार घेतला असून सोशल मिडियाच्या माध्यमातुन युवाराष्टÑची संकल्पना मांडली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वायफळ खर्च टाळून गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारे अभिनव काम करणाºया युवाराष्ट्रचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

Web Title: Digital class room started in tribal school