शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचा जीव टांगणीला

By admin | Updated: September 5, 2014 01:19 IST

पंधरवड्यात भाजपची पहिली यादी; बाळापूर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची स्थानिक उमेदवारीची मागणी.

अकोला : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संभाव्य उमेदवारांची पहिली यादी येत्या पंधरवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. एबीसी च्या निकषानुसार पहिल्या यादीत संबंधित मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावाचा समावेश राहील. मात्र यातही निवडून आलेल्या ७0 टक्के उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सामोरे जात आहे. महायुतीमधील भाजप व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून शितयुद्ध सुरू आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ५0-५0 असावा, अशी भूमिका घेत भाजपने १३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार व एबीसी निकषानुसार ज्या मतदारसंघात वर्तमान लोकप्रतिनिधी आहेत व ज्यांचा विजय सुनिश्‍चि त आहे, अशा उमेदवारांना प्राधान्याने तिकीट वाटप केले जाणार आहे. यातही सरसकट नव्हे तर ७0 टक्के उमेदवार गृहीत धरल्या जाणार असल्याने उर्वरित ३0 टक्के उमेदवारांचा पत्ता कट होईल, हे निश्‍चित आहे. अशा उमेदवारांनी पक्षाची मनधरणी सुरू केली असून, यामध्ये प्रामुख्याने मूर्तिजापूर मतदारसंघातील इच्छुकांचा समावेश आहे. संबंधित उमेदवाराच्या नावाचा पक्षाच्या यादीत समावेश नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. येत्या पंधरवड्यात भाजपच्यावतीने पहिली यादी जाहिर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर एबीसी नुसार टप्याटप्याने दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ** पार्सल उमेदवार नको!कधीकाळी भाजपच्या ताब्यात असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अकोल्यातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भात बाळापूर मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तीव्र भावना व्यक्त केल्याची माहिती आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट द्या, पार्सल उमेदवार लादू नका, अशा स्वरूपाची विनंती पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडे करण्यात आली.