शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर सहा तासांच्या आत व्हावे देहदान

By admin | Updated: January 21, 2015 01:03 IST

अकोला वैद्यकीय महाविद्यालयाला वर्षाला हवेत सहा पार्थिव.

सचिन राऊत / अकोला:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला सहा पार्थिवांची आवश्यकता असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे, देहदान आणि अवयवदानाबाबत जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जनजागृती असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही पार्थिव बाहेरगावावरून मागवावे लागले नसल्याची माहिती आहे.कोणत्याही व्यक्तीने जिवंत असताना देहदान किंवा इतर अवयवांचे दान करण्याचा संकल्प केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात त्याची रीतसर नोंदणी होते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पार्थिव रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करणे आवश्यक राहते. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे पार्थिव ह्यफ्रझनह्ण करून ठेवले जाते.या प्रक्रियेमुळे कोणत्याही व्यक्तीचे पार्थिव हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षे जसेच्या तसे राहते. मृतदेहातील प्रत्येक पेशी, प्रत्येक हाड, मेंदू आणि प्रत्येक अवयव हे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी मोलाचा ठरतात.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन देहदानासाठी पुढाकार घेत असून, शरीररचनाशास्त्र विभाग यासाठी विविध उपक्रमही राबवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देहदान एक अनमोल दान आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यास यामुळे मोठी मदत होत असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाद्वारे देण्यात आली.*प्रभावती नारेंचे पार्थिव शरीररचनाशास्त्र विभागातप्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या मातोश्री माजी शिक्षिका प्रभावती नारे यांचे देहदान करण्यात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात त्यांच्या पार्थिवाचे फ्रझन करण्यात आले. हे पार्थिव आता वर्षानुवर्षे राहणार आहे. एका शिक्षिकेचे पार्थिव मृत्यूनंतरही आता वैद्यकीय विद्यार्थ्यांंच्या ज्ञानात मोलाची भर टाकणार आहे. प्रभावती नारे यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.