कॉँग्रेसचा पराभव ही सामूहिक जबाबदारी

By Admin | Updated: May 23, 2014 20:50 IST2014-05-23T20:12:01+5:302014-05-23T20:50:15+5:30

महासचिव राजेश भारती यांचे मत

The defeat of Congress is collective responsibility | कॉँग्रेसचा पराभव ही सामूहिक जबाबदारी

कॉँग्रेसचा पराभव ही सामूहिक जबाबदारी

अकोला : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा झालेला पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे महासचिव राजेश भारती यांनी कळविले आहे.
यूपीए सरकारने प्रत्येक समाज घटकासाठी जननी सुरक्षा कल्याणकारी योजना जाहीर केल्या. अन्न सुरक्षा व शिक्षण हक्क कायदे केले. मात्र यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराचीच प्रसिद्धी जास्त झाली. जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणीही झाली. त्यामुळे कॉँग्रेसचा पराभव झाल्याचे महासचिव भारती यांचे मत आहे. जिल्‘ात बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. कॉँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले असून, मतांमध्ये ७५ हजारांनी वाढ झाली. या पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही भारती यांनी कळविले आहे.

Web Title: The defeat of Congress is collective responsibility