शेतक-याचा मृतदेह नदीपात्रात आढळला

By Admin | Updated: August 26, 2015 01:43 IST2015-08-26T01:43:29+5:302015-08-26T01:43:29+5:30

आपोती खुर्द येथील एका शेतक-याचा मृतदेह लोणार नदीच्या पात्रात आढळला.

The dead body of the farmer found in the river bed | शेतक-याचा मृतदेह नदीपात्रात आढळला

शेतक-याचा मृतदेह नदीपात्रात आढळला

बोरगाव मंजू (जि. अकोला): आपोती खुर्द येथील एका शेतकर्‍याचा मृतदेह लोणार नदीच्या पात्रात मंगळवारी आढळून आला. दिगांबर जगदेव तल्हाडे (वय ७0) हे सोमवारी सकाळी घरून निघाले; मात्र ते रात्रीपर्यंतही घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. अखेर मंगळवारी त्यांचा मृतदेह लोणार नदीच्या पात्रात आढळून आला. याप्रकरणी सुरेश तल्हाडे यांनी बोरगाव मंजू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The dead body of the farmer found in the river bed