शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवस व रात्रीच्या तापमानातील फरकामुळे पिकं संकटात

By admin | Updated: July 18, 2015 01:19 IST

रोपांची खोडं होत आहेत लाल.

विवेक चांदूरकर/ अकोला: गत एक महिन्यापासून पश्‍चिम विदर्भाकडे पावसाने पाठ फिरविल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. दिवस आणि रात्रीच्या तापमानात १४ ते १६ डिग्री सेल्सीअसची तफावत निर्माण झाली असून, शेतातील रोपांची मुळं अद्याप जमिनीत खोल रुजलेली नसताना जमिनीला पडलेल्या भेगांमुळे तापमानातील तफावतीचा सरळ परिणाम पिकांवर होऊन पिकं संकटात सापडली आहेत. जून महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाल्यानंतर, बहुतांश शेतकर्‍यांनी लगबगीने पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी दिली. एक महिना उलटला तरी, अद्याप पाऊस नाही. त्यामुळे पिके सुकत असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. दुसरीकडे दिवसाच्या तापमानात वाढ होऊन, कडक उन पडत आहे. या भागातील तापमान दुपारच्या सुमारास ३८ डिग्रीपर्यंत असते. रात्री घट होऊन, तापमान २२ ते २४ डिग्रीपर्यंत असते. दिवस व रात्रीच्या तापमानात १४ ते १६ डिग्री सेल्सिअसपर्यंत तफावत निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम पडत आहे. सध्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. लहान रोपांची मुळे जमिनीत सहा इंचापर्यंत रुजली आहेत. जमिनीतील सहा इंचांपर्यंत माती मुळांना अन्नद्रव्ये मिळण्यासाठी पोषक असते व मुळं अन्नद्रव्ये ग्रहण करीत असतात. सध्या विदर्भात जमिनीला भेगा पडल्याने, जमिनीवरील तापमानाचा सरळ परिणाम मुळांवर होत आहे. यामुळे रोपांची वाढ खुंटली असून, खोड लाल पडत आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या सर्वच रोपांची मुळं आता लाल झालेली दिसतात. या रोपांना कोणताही आजार आलेला नसून, तापमानातील बदलामुळे रोपे सुकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. वातावरणातील बदलामुळे रोपांची मुळं लाल होत आहेत. त्यामुळे रोपे सुकत आहेत. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होत असले, तरी यावर कोणताही उपाय नसल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी सांगीतले.

*उपाय नाहीच

         वातावरणातील बदलामुळे पिकांवर हे संकट ओढवले आहे. सध्या रोपांची खोडं लाल होत असून, त्यामुळे रोपे सुकत आहेत. शेतकर्‍यांचे हे नुकसान भरून न निघण्यासारखे आहे. यावर काहीही उपाय नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जोरदार पाऊस झाला तर वातावरण थंड होईल, सोबतच जमिनीच्या भेगाही भरून निघतील, त्यानंतर रोपांना फायदा होऊ शकतो.